भाजप नेते येडियुरप्पा यांच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातून एक हादरवणारी बातमी समोर येत आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला असून या आरोपाखाली त्यांच्यावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. येडियुरप्पा यांच्यावर १७ वर्षांच्या मुलीसोबत लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बातमीने कर्नाटकातच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने बेंगळुरूमधील सदाशिवनगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. मुलीच्या आईने बीएस येडियुरप्पा यांच्यावर २ फेब्रुवारी रोजी झालेल्या अधिकृत बैठकीत लैंगिक छळाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी येडियुरप्पा यांच्या विरोधात पॉक्सो कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एवढच नव्हे कलम 354A अंतर्गत गुन्हाही दाखल आहे. बीएस येडियुरप्पा यांनी अद्याप या आरोपांबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

मात्र बीएस येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने याबाबत एक निवेदन जारी करत सदर महिलेवरच आरोप केले आहेत. सदर महिलेच्या अशाप्रकारच्या आत्तापर्यंत ५३ प्रकरणाची यादी दाखवत अशा तक्रारी करण्याची सवयच सदर तक्रारदाराला आहे असं येडियुरप्पा यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं. परंत्तू वयाच्या ८१ व्या वर्षी येडियुरप्पा यांच्या POCSO अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.