हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSF Recruitment 2025 – तुम्ही जर बारावीत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. केंद्र सरकारकडून सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) अंतर्गत सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदाच्या 252 जागांचे अर्ज सुरू झाले असून , 21 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ज्या विद्यार्थ्यांना आर्मीमध्ये करियर करायचे असेल , त्यांच्यासाठी केंद्र सरकारने जबरदस्त संधी उपलब्ध करून दिली आहे. या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच हा अर्ज करण्याआधी या जाहिरातीचे सर्व निकष https://rectt.bsf.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तर चला या जाहिरातीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
पदाचे नाव (BSF Recruitment 2025) –
BSF अंतर्गत सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार 12वी पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी 35 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
वेतनश्रेणी –
सहायक उपनिरीक्षक – रु 29200/- – 92300/-
हेड कॉन्स्टेबल – रु 25500/- – 81100/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन (BSF Recruitment 2025)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भर्ती शाखा, महासंचालनालय, बीएसएफ ब्लॉक -10, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड नवी दिल्ली.
आवश्यक कागदपत्र –
तपासणी प्रमाणपत्र (Vigilance Clearance Certificate)
आधारकार्ड
पॅनकार्ड
फोटो
शैक्षणिक प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा.