BSNL 5G Service : या शहरात सुरु झाली BSNL ची 5G सर्व्हिस

BSNL 5G Service
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशी टेलिकॉम कंपनी BSNL ने प्रथमच 5G सेवा लाँच केली आहे. भारतातील हैद्राबाद शहरात बीएसएनएलने क्वांटम ५जी सेवा सॉफ्ट लाँच केली आहे. यूजर्स सूचनेनुसार, BSNL ने त्यांच्या ५जी सेवेचे नाव क्यू-५जी म्हणजेच क्वांटम ५जी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसएनएलने अधिकृत निवेदन जारी करून या 5G सर्व्हिस बद्दल माहिती दिली आहे. परंतु हि सर्व्हिस अजून व्यावसायिकरित्या सुरू झालेली नाही. मात्र 5G सेवा सुरु करण्याच्या दिशेने बीएसएनएलने टाकलेले हे महत्वाचे पाऊल म्हंटल जातंय.

बीएसएनएल इंडियाने त्यांच्या एक्स हँडलद्वारे सांगितले की कंपनीचे सीएमडी ए रॉबर्ट जे रवी यांनी तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये क्वांटम ५जी एफडब्ल्यूए (फिक्स्ड वायरलेस अ‍ॅक्सेस) सेवा (BSNL 5G Service) सुरू केली आहे. लवकरच, ती देशातील इतर निवडक शहरांमध्ये सुरू केली जाईल. या सेवेद्वारे, वापरकर्त्यांना सुपरफास्ट ५जी इंटरनेट अॅक्सेस मिळेल. यूजर्स बीएसएनएल क्यू-५जी एफडब्ल्यूएद्वारे जलद इंटरनेट अॅक्सेस करू शकतील.

बीएसएनएल ५जी (BSNL 5G Service) सध्या तरी फक्त हैदराबादमध्ये उपलब्ध असली तरी ती लवकरच देशातील इतर शहरांमध्ये सुरु करण्याचा प्रयत्न सुरू आहे. २०२५ च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला बीएसएनएल ५जी सुरू होण्याची अपेक्षा आहे. मे २०२३ मध्ये, बीएसएनएलने एरिक्सनला टेलिकॉम उपकरणे बसवण्याचे कंत्राट दिले होते. याशिवाय, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि तेजस नेटवर्कला मोबाईल टॉवर बसवण्याचे काम देण्यात आले. सरकारी टेलिकॉम कंपनीने पुढील १० वर्षांसाठी त्यांच्या नवीन 4G मोबाईल टॉवरच्या देखभालीसाठी १३ हजार कोटी रुपये गुंतवले आहेत.

१ लाख नवीन 4G/5G टॉवर्स– BSNL 5G Service

बीएसएनएल ने भारतात आपले नेटवर्क सुधारण्यासाठी १ लाख नवीन ४G/५G मोबाइल टॉवर्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अपेक्षित आहे. गेल्या वर्षी, बीएसएनएलने १ लाख ४G/५G मोबाइल टॉवर्स बसवण्याचा निर्णय घेतला होता, त्यापैकी ७० हजारांहून अधिक मोबाइल टॉवर्स लाईव्ह केले आहेत. त्याच वेळी, कंपनीने १ लाख नवीन टॉवर्स बसवण्याचे काम पूर्ण केले आहे. चांगल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी आणखी १ लाख टॉवर्स बीएसएनएल कडून बसवले जातील.