BSNL 5G : BSNL ची 5G टेस्टिंग यशस्वी; बाकी कंपन्यांना दणका बसणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BSNL 5G । जिओ, एअरटेल आणि वोडाफोन- आयडिया या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यानी आपल्या रिचार्जच्या किंमत वाढवल्याने सर्वसामान्य माणसाच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. त्यामुळे अनेक ग्राहक देशी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे वळत आहेत. बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन कमी पैशात उपलब्ध असल्याने ग्राहकांना सुद्धा चांगलंच परवडत. मात्र स्लो नेटवर्क हि बीएसएनएलची मुख्य चिंता आहे. परंत्तू सध्याच्या एकूण परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी बीएसएनएल सुद्धा एक पाऊल पुढे टाकत आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वत: बीएसएनएल 5G चे टेस्टिंग सुरु केलं आहे. हे टेस्टिंग यशस्वी झालं असून कंपनीसाठी हे मोठं यश म्हणावं लागेल.

5 जी तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ कॉल- BSNL 5G

BSNL 5G च्या टेस्टिंग साठी सिंधिया स्वत: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT) येथे पोहोचले. त्यांनी स्वतः बीएसएनएलच्या 5 जी तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ कॉल केला आणि 5G नेटवर्कच्या क्षमतेची चाचणी केली. या टेस्टिंग नंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आगामी काळात लवकरच आपल्याला BSNL 5G नेटवर्क पाहायला मिळेल, भारताच्या दूरसंचार क्षेत्रात हा एक मैलाचा दगड ठरेल. असं झाल्यास एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया यासारख्या टेलिकॉम कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी BSNL 5G बद्दल टेक एक्सपर्ट्स आणि टेक्नॉलॉजीवर चर्चा केली. जागतिक तंत्रज्ञान उद्योगातील भारताच्या धोरणाबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले. भारतात नवीन तंत्रज्ञानावर काम सुरू असल्याचे सिंधिया यांनी सांगितलं. नवीन तंत्रज्ञान आल्यावर लवकरच संपूर्ण जग भारताकडे बघेल असा विश्वास ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केला. तसेच 6G तंत्रज्ञानावरही BSNL लवकरच काम सुरु करेल असं सिंधिया यांनी म्हंटल.