BSNL Annual Recharge Plan | Jio, Vi आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी BSNL ने आणला वार्षिक रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BSNL Annual Recharge Plan | जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया टेलिकॉम कंपन्यांनी bमागील काही दिवसांपासून त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवलेल्या आहेत. जवळपास 100 ते 150 रुपयांनी त्यांनी प्रत्येक प्लॅनची किंमत वाढवलेली आहे. परंतु या सगळ्यांमध्ये सध्या बीएसएनएलला मोठ्या प्रमाणात लोक प्रतिसाद देताना दिसत आहेत. बीएसएनएलने (BSNL Annual Recharge Plan)त्यांचे नवीन रिचार्ज प्लॅन देखील लॉन्च केले आहेत. त्यांच्या ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना जोडण्यासाठी त्यांनी हे प्लॅन लॉन्च केले आहे. जे जिओ एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत. आता हे कोणते प्लॅन आहेत हे आपण जाणून घेऊया.

BSNL चा 2395 रुपयांचा प्लॅन | BSNL Annual Recharge Plan

BSNL चा हा नवीन 2395 रुपयांचा प्लॅन लॉन्च केलेला आहे. या प्लॅनची वैधता 395 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 3 जीबी डाटा त्याचप्रमाणे अमर्यादित वाईस कॉलिंग आणि 100 एसएमएस दररोज असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 3G नेटवर्कचा अनुभव घेता येणार आहे. त्याचप्रमाणे 4G नेटवर्क देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

एअरटेलचा 3599 रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा हा 3599 रुपयांचा प्लॅन 365दिवसांसाठी आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा मिळेल. त्याचप्रमाणे अमर्यादित वाईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ घेता येईल. परंतु हा प्लॅन बीएसएनएलच्या एक वर्षाच्या प्लॅनपेक्षा 50% महाग आहे.यामध्ये तुम्हाला 5G नेटवर्क देखील प्रदान केले जाईल.

जिओचा 3599 रुपयांचा प्लॅन

जिओचा हा 3599 रुपयांचा प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5 जीबी डाटा मिळेल. त्याचप्रमाणे अमर्यादित वाईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील फ्री मिळतील. जिओचा हा प्लॅन देखील बीएसएनएलच्या प्लॅनपेक्षा जास्त महाग आहे.

वोडाफोन आयडियाचा 3699 रुपयांचा प्लॅन

वोडाफोन आयडियाने हा 3699 रुपयांचा वार्षिक प्लॅन आणलेला आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 2 जीबी डेटा मिळेल. त्याचप्रमाणे अमर्यादित व्हॉईसकॉलिंग करता येईल. तसेच 100 एसएमएसचा देखील लाभ घेता येईल. या प्लॅनमध्ये तुम्हाला 4 G इंटरनेट दिले जाईल.