हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बीएसएनएल (BSNL) ही टेलिफोन कंपनी सध्या चांगलीच आघाडीवर आहे. जुलै महिन्यामध्ये अनेक लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरामध्ये वाढ केल्यामुळे अनेक ग्राहक हे बीएसएनएलकडे वळाले. बीएसएनएल ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. टेलिकॉम कंपनी लवकरच त्यांच्या ग्राहकांसाठी 5G सेवा करणार आहे. देशातील अनेक ठिकाणी ही 4G सेवा चालू देखील झालेली आहे. येत्या जूनमध्ये 5ग सेवेची घोषणा देखील बीएसएनएल करू शकते. या कंपनीने आज दिल्लीत आयोजित झालेल्या एका कार्यक्रमात त्यांच्या कंपनीचा नवीन लोगो आणि घोषवाक्य लाँच केलेले आहे. तसेच कंपनीने 7 नवीन सेवा देखील जाहीर केलेल्या आहेत.
बीएसएनएलने बदलला लोगो
कंपनीने याआधी 2000 साली त्यांचा लोगो बदलला आहे. आणि घोषवाक्य देखील आता बदलण्यात आलेले आहे. बीएसएनएलचा लोगोमध्ये या आधी निळे आणि लाल बाण होते. पण ते आता पांढरे आणि हिरव्या रंगाचे झालेले आहेत. तसेच लोगोमध्ये राखाडी रंगाचे वर्तुळ आहे. जे आता पूर्णपणे बदललेले आहेत. या लोगोचे डिझाईन पूर्वीसारखेच ठेवण्यात आलेले आहेत. मध्यभागी असलेल्या वर्तुळाचा रंग भगवा करण्यात आलेला आहे. आणि वर्तुळात भारताचा नकाशा दाखवण्यात आलेला आहे.
सरकारने या नवीन बीएसएनएलच्या लोगोमध्ये भारतीय ध्वजाचे तिन्ही रंग वापरलेले आहेत बीएसएनएल जे जुने वाक्य हे कनेक्टिंग इंडिया असे होते ते बदलून आता कनेक्टिंग भारत असे करण्यात आलेले आहेत. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीच्या या नवीन लोगोचे अनावरण केलेले आहे. आता एआय द्वारे स्पॅम कॉल आणि मेसेज ब्लॉक करण्याचे तंत्रज्ञान देखील विकसित केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या युजर्सला आता स्कॅमरचे कॉल आणि मेसेज नेटवर्क ब्लॉक केले जाणार आहे.
बीएसएनएलच्या कंपनीने आता पूर इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कनेक्टिव्हिटीसाठी कम्युनिकेशन रिस्पॉन्स कम्युनिकेशन सेवा सुरू केलेली आहे. अशा वेळी सरकार मदत करणार आहेत. आणि बाधित भागात कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे.