BSNL Freedom Offer : फक्त 1 रुपयांत मोबाईल रिचार्ज!! महिनाभर घ्या मज्जा

BSNL Freedom Offer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BSNL Freedom Offer । मोबाईल रिचार्ज हि आजकाल जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. परंतु यासाठी महिन्याला कमीत कमी २०० रुपयांचा खर्च असल्याने सर्वसामान्य चांगलेच हैराण झाले आहेत. jio, airtel, vodafone idea सारख्या कंपन्या रिचार्जच्या माध्यमातून जबरदस्त कमाई करत आहेत, तर दुसरीकडे ग्राहकाच्या खिशाला मात्र चांगलाच चाप बसत आहे. परंतु आता गुड न्यूज आहे. आता फक्त १ रुपयांत तुम्हाला महिनाभरासाठी रिचार्ज करता येणार आहे. होय, देशी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी यासाठी खास योजना लाँच केली आहे.

काय काय फायदे मिळणार? BSNL Freedom Offer

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एक धमाकेदार ऑफर सादर केली आहे. BSNL Freedom Offer ऑफर असं या योजनेचे नाव असून या ऑफरच्या माध्यमातून फक्त 1 रुपयात नवीन सिम घेऊन ग्राहकांना 30 दिवसांसाठी अमर्याद कॉलिंग, दररोज 2GB हाय स्पीड डेटा आणि 100 मोफत एसएमएसचा आनंद घेता येणार आहे. ही ‘स्वातंत्र्य ऑफर’ 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत देशभरातील सर्व टेलिकॉम सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. हा उपक्रम बीएसएनएलच्या भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचे प्रतीक आहे आणि नागरिकांना भारताच्या स्वतःच्या स्वदेशी विकसित ४जी तंत्रज्ञानाचा मोफत अनुभव घेण्याची संधी देतो,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए रॉबर्ट जे रवी यांनी या खास योजनेबद्दल माहिती देताना म्हंटल कि, आम्ही या BSNL Freedom Offer अंतर्गत ग्राहकांना मोफत बीएसएनएल सिमकार्ड आणि त्यासोबत ३० दिवसांसाठी अनलिमिटेड व्हाईस कॉल, दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा आणि दिवसाला १०० एसएमएसचा लाभ देतोय. बीएसएनएलच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेअंतर्गत डिझाइन केलेल्या, विकसित केलेल्या ४जी प्लॅनमुळे आम्हाला अभिमान आहे की आम्ही भारताला अशा निवडक राष्ट्रांमध्ये स्थान देत आहोत ज्यांनी स्वतःचा टेलिकॉम स्टॅक तयार केला आहे. आमची BSNL Freedom Offer योजना’ प्रत्येक भारतीयाला ३० दिवसांसाठी या स्वदेशी नेटवर्कची चाचणी घेण्याची आणि अनुभव घेण्याची संधी देते आणि आम्हाला विश्वास आहे की ग्राहकांना बीएसएनएलमधील फरक नक्की दिसेल.