हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या महागाई सोबत मोबाईलच्या रिचार्ज दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मागील काही महिन्यांमध्ये भारतातील अनेक खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरामध्ये वाढ केलेली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक हे सरकारी कंपनी बीएसएनएलकडे वळालेले आहेत. बीएसएनएल देखील त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. आता जर तुम्ही बीएसएनएलचे ग्राहक असाल किंवा बीएसएनएलकडे जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप खास आहे. कारण बीएसएनएलने त्यांचे काही नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेले आहे.या प्लॅनची सुरुवात केवळ 58 रुपयांपासून होत आहे. आता आपण हे प्लॅन नक्की काय असणार आहे जाणून घेणार आहोत.
सध्या बीएसएनएलने 100 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या अनेक रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेले आहेत. त्याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे. वाढत्या महागाईमध्ये बीएसएनएलच्या युजरला हा एक मोठा दिलासा मिळणार आहे .आता आपण बीएसएनएलच्या याच 100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या रिचार्ज प्लॅन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत
58 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
तुम्हाला जर कमी काळासाठी कमी किमतीत रिचार्ज प्लॅन पाहिजे असेल, तर 58 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी खूप खास आहे. 58 रुपयांचा हाय स्पीड डेटा असलेला रिचार्ज प्लॅन आहे. परंतु यामध्ये तुम्हाला कॉलिंग आणि एसएमएस पॅक देत नाही. तुम्हाला या डेटामध्ये रोज 2 जीबी डेटा वापरायला मिळणार आहे.
98 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
बीएसएनएलचा 98 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा 18 दिवसांसाठी आहे. या मध्ये तुम्हाला 36 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच तुम्हाला दररोज दोन जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. तुमचा डेटा संपत असेल तरी देखील तुम्हाला 40 केबीपीएस च्या स्पीडने 18 दिवस डेटा वापरण्यास मिळणार आहे.
97 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
बीएसएनएल 97 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये तुम्हाला कॉलिंग आणि डेटा दोन्ही गोष्टी वापरायला मिळतात. यामध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा वापरायला मिळतो. तसेच तुमचा हा प्लॅन संपला तरी तुम्हाला 40 केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरता येते.
94 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
94 दिवसांच्या या रिचार्ज प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला 90 जीबी डेटा वापरायला मिळतो. दिवसाला तुम्ही 3 जीबी डेटा वापरू शकता. त्याचप्रमाणे नॅशनल तसेच लोकल कॉलसाठी तुम्ही 200 मिनिटे बोलू शकता.
87 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
87 दिवसांचा रिचार्ज त्यांची व्हॅलिडीटी 14 दिवसांची आहे. यामध्ये तुम्ही अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा घेऊ शकता. जर तुम्हाला इंटरनेटची गरज लागत नसेल, तर 87 रुपयांचा हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा प्लॅन आहे.