BSNL Mobile : BSNL लाँच करणार स्वस्त Mobile; Jio चं टेन्शन वाढलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही महिन्यापूर्वीच Airtel , Jio आणि Vi या टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या किंमती वाढवल्यानंतर अनेक ग्राहकांचा कल हा देशी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे वळला आहे. बीएसएनएल सुद्धा अगदी कमी पैशात ग्राहकांना स्वस्त रिचार्ज ऑफर करत आहे. त्यामुळे बीएसएनएल ग्राहकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. आता कंपनीने ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिली आहे. बीएसएनएल लवकरच स्मार्टफोन (BSNL Mobile) लाँच करणार आहे. त्यासाठी कंपनीने Karbonn Mobiles सोबत हातमिळवणी सुद्धा केली आहे. हा स्मार्टफोन जिओ फोन पेक्षाही स्वस्त असतो असं बोललं जातंय. त्यामुळे मुकेश अंबानी यांच्यासाठी हा मोठा झटका असेल.

फोनसोबत BSNL सिम देखील उपलब्ध – BSNL Mobile

बीएसएनएलने याबाबत ट्विट करत म्हंटल कि, कार्बन मोबाईल् सोबत पार्टनरशिप करून एक नवीन फीचर फोन आणत आहे. हा मोबाईल Bharat 4G कॅम्पेन मार्फत रिलीज करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनची थेट स्पर्धा Jio Bharat 4G सोबत असणार आहे, जो कमी किंमतीत जास्त कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. या फोनसोबत बीएसएनएल सिम देखील उपलब्ध असेल आणि या मोबाईलच्या मदतीने तुम्ही अतिशय जलद इंटरनेट वापरू शकता. BSNL च्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना कमी दरात 4G नेटवर्कचा फायदा मिळणार आहे. हा स्मार्टफोन चांगल्या नेटवर्क कव्हरेजसाठी डिझाइन केला आहे. त्यामुळे Jio ला ग्रामीण क्षेत्रात BSNL कडून चांगली टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

AI आधारित तंत्रज्ञानांचा समावेश –

या स्मार्टफोनमध्ये 4G आणि 5G नेटवर्क अपग्रेड असणार आहे. त्याचसोबत स्पॅम फ्री नेटवर्कसाठी AI आधारित तंत्रज्ञानांचा समावेश असेल. अनेक फीचर्सनी परिपूर्ण असणारा हा मोबाईल (BSNL Mobile) लवकरच ग्राहकांचे लक्ष वेधून घेणार आहे. या मोबाईल मध्ये दमदार इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटरीचा समावेश आहे.

या वर्षी 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 (India Mobile Congress 2024) आयोजित करण्यात आला आहे. हा इव्हेंट भारतातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान आणि टेलिकॉम क्षेत्रातील प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. जिथे नवीन तंत्रज्ञान, इनोव्हेशन्स, आणि भविष्यातील कल्पना मांडल्या जातात. या वर्षीच्या काँग्रेसमध्ये 5G, AI, आणि IoT सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर खास लक्ष दिले जाणार आहे. BSNL देखील त्यांच्या 4G आणि 5G सेवा तसेच AI आधारित स्पॅम फ्री नेटवर्कची माहिती या कार्यक्रमामध्ये देणार आहे.