BSNL Network Coverage । देशातील जिओ, एअरटेल आणि वोडाफोन- आयडिया या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्याने सर्वसामान्य ग्राहकांचा खिशाला चाप बसला आहे. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी अनेक ग्राहक देशी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे वळत आहे. BSNL चे कमी किमतीत उपलब्ध असल्याने ग्राहकांना चांगलंच परवडत. परंतु देशात सर्वच ठिकाणी बीएसएनएलला नेटवर्क आहे असं नाही. अनेक ठिकाणी आजही BSNL पोचू शकलेलं नाही. अशावेळी तुमच्या भागात नेटवर्क आहे कि नाही ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अनेकजण आपलं जिओ, एअरटेलचे सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करत आहेत. मात्र टेलिकॉम नियमांनुसार, एकदा जियो, एअरटेल किंवा वोडाफोन-आयडिया मधून BSNL मोबाइल नेटवर्कवर स्विच केल्यास तुम्ही 90 दिवस म्हणजे 3 महिन्यापर्यंत दुसऱ्या नेटवर्कवर स्विच करू शकत नाही. त्यामुळे कोणतेही सीम कार्ड बीएसएनएल मध्ये पोर्ट करण्यापूर्वी तुम्ही ज्याठिकाणी राहता त्या भागात BSNL ला रेंज आहे का?? (BSNL Network Coverage) हे आधी जाणून घ्या आणि त्यानंतर BSNL कार्ड विकत घेण्याचा किंवा पोर्ट करण्याचा निर्णय घ्या. यासाठी तुम्हाला NPERF वेबसाइटवर जावं लागेल. हि एक ग्लोबल वेबसाइट आहे जिथे सर्व देशांमधील मोबाइल नटेवर्क कव्हरेज पाहता येते.
कशी आहे प्रॉसेस– BSNL Network Coverage
सर्वात आधी nperf वेबसाइटवर जा.
त्यानंतर तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसेल, ज्यातून Map ऑप्शनवर जा.
त्यानंतर Country आणि मोबाइल नेटवर्क ऑप्शन सिलेक्ट करा.
त्यानंतर तुमचं लोकेशन किंवा शहर सर्च करा.
अशाप्रकारे तुम्ही तुमच्या क्षेत्रातील BSNL सह इतर कोणतंही नेटवर्क सर्च करू शकता.
BSNL मध्ये मोबाइल नंबर पोर्ट कसा करायचा
सर्वप्रथम 1900 वर पोर्ट रिक्वेस्ट पाठवा.
यासाठी मेसेज बॉक्समध्ये ‘PORT स्पेस आणि 10 डिजिट मोबाइल लिहून पाठवा.
त्यानंतर BSNL सेंटरवर जाऊन आधारसह इतर माहिती द्या.
अशाप्रकारे तुमची पोर्ट रिक्वेस्ट पूर्ण होईल.