BSNL New Feature | BSNL यूजर्ससाठी मोठी बातमी ! स्पॅम कॉल टाळण्यासाठी कंपनीने लाँच केले नवे फीचर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BSNL New Feature | यावर्षी रिलायन्स जिओ आणि एअरटेल तसेच Vi च्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांमध्ये देखील नाराजी झाली आणि अनेक ग्राहक हे बीएसएनएलकडे वळाले. त्यामुळे बीएसएनएलला देखील खूप चांगला फायदा झालेला आहे. आता हेच नवीन आलेले ग्राहक टिकून ठेवण्यासाठी बीएसएनएल कंपनी ही नवनवीन योजना आणत असतात. आणि आज ग्राहकांना अगदी कमीत कमी किमतीमध्ये रिचार्ज प्लॅन देत असतात.

बीएसएनएल ही कंपनी सध्या त्यांच्या 4G नेटवर्क वर सातत्याने काम करत आहे. कंपनीने सांगितले आहे की, या वर्षाच्या अखेर पर्यंत अनेक भागांमध्ये फोरजी नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी दिसून येईल. त्याचप्रमाणे स्पॅम कॉल टाळण्यासाठी देखील बीएसएनएलने एक नवीन सेवा सुरू केलेली आहे. यासाठी एक चांगला मार्ग त्यांनी अवलंबला आहे. आता जर तुम्हाला मेसेज किंवा कॉल येत असेल तर तुम्ही बीएसएनएलच्या एका नंबरवर कॉल करून तक्रार करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला त्यांची चांगली सेवा मिळेल. आता ही सेवा नक्की कशाप्रकारे असणार आहे. आणि कसा वापर करायचा याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

ॲपच्या मदतीने तुम्ही तक्रार करू शकता | BSNL New Feature

बीएसएनएल युजर्स कंपनीच्या सेल्फकेअर ॲपच्या मदतीने सहजपणे तक्रारी नोंदवू शकतात. सध्या इतर कोणत्याही कंपनीकडे अशी सुविधा नाही. सेल्फकेअर ॲपच्या मदतीने तुम्ही स्पॅम संदेशांची तक्रार कशी करू शकता हे जाणून घेऊया

अशा प्रकारे सेल्फकेअर ॲप वापरू शकता

  • सर्वप्रथम तुमचा फोन BSNL Selfcare App उघडा.
  • आता तुम्हाला स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपर्यात असलेल्या तीन ओळींच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल आणि तक्रार आणि प्राधान्य पर्याय निवडावा लागेल.
  • नंतर उजवीकडे तीन-लाइन मेनू टॅप करा आणि अहवाल द्या.
  • आता तुम्हाला New Complaint वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला एसएमएस किंवा व्हॉईस कॉलमधील पर्याय निवडावा लागेल. आणि नंतर संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
  • शेवटी, तपशील भरल्यानंतर, तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.