BSNL रिचार्जवर 1 लाखांचे बक्षीस; पहा काय आहे ऑफर?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ला सध्या प्रचंड मागणी वाढत आहे. जिओ, एअरटेल सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाईल रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर स्वस्तात मस्त रिचार्जसाठी ग्राहकवर्ग बीएसएनएल कडे वळू लागले आहेत. कमी पैशात रिचार्ज प्लॅन उपलब्ध असल्याने सर्वसामान्य नागरिकांना BSNL एक आशेचा किरण आहे. आता तर BSNL ने ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. या ऑफरच्या माध्यमातून काही ठराविक रिचार्जवर तब्बल १ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलं आहे.

BSNL निवडक स्पेशल टॅरिफ व्हाउचर (STV) सह 1 लाख रुपयांचे बक्षीस देत आहे. BSNL प्रीपेड मोबाईल ग्राहक पात्र होण्यासाठी या STV वरून रिचार्ज करू शकतात. बीएसएनएलने म्हटले आहे की ते ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देतील मात्र जे यूजर्स झिंग ॲप वापरतील त्यांनाच हे बक्षीस दिले जाईल. हे STV 118 रुपये, 153 रुपये, 199 रुपये, 347 रुपये, 599 रुपये, 997 रुपये , 1999 रुपये आणि 2399 रुपयांचे आहेत. या प्लॅन्सचा रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या मोबाईलमध्ये झिंग ॲप डाउनलोड करावे लागेल. यानंतर, जर तुम्ही भाग्यवान असाल तर तुम्ही BSNL कडून बक्षीस जिंकू शकाल.

BSNL ची ही ऑफर नवीन ग्राहकांना आपल्याप्रति आकर्षित करण्यासाठी आणि जे ग्राहक सिमकार्ड असूनही रिचार्ज करत नाहीत अशा ग्राहकांनी रिचार्ज करण्यासाठी आणली आहे. तुम्ही अजूनही बीएसएनएलचे ग्राहक नसल्यास, तुम्ही नवीन सिम मोफत खरेदी करू शकता. कंपनीने मोफत 4G सिम कार्ड देत असल्याची सुद्धा घोषणा केली आहे. जर तुमच्याकडे जिओ एअरटेल किंवा वोडाफोन आयडीयाचे सिम असेल तर तुम्ही ते बीएसएनएल मध्ये पोर्ट करू शकता. तसा विचार केला तर देशातील सर्व टेलिकॉम ऑपरेटर्समध्ये BSNL चे रिचार्ज प्लॅन सर्वात स्वस्त आहेत. मात्र हाय-स्पीड नेटवर्कच्या कमतरतेमुळे, बीएसएनएल एअरटेल, जिओ ला टक्कर देऊ शकली नाही.

BSNL मध्ये मोबाइल नंबर पोर्ट कसा करायचा

सर्वप्रथम 1900 वर पोर्ट रिक्वेस्ट पाठवा.
यासाठी मेसेज बॉक्समध्ये ‘PORT स्पेस आणि 10 डिजिट मोबाइल लिहून पाठवा.
त्यानंतर BSNL सेंटरवर जाऊन आधारसह इतर माहिती द्या.
अशाप्रकारे तुमची पोर्ट रिक्वेस्ट पूर्ण होईल.