हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशी टेलिकॉम कंपनी BSNL ही त्यांच्या स्वस्त मोबाईल रिचार्ज साठी ओळखली जाते. वोडाफोन, आयडिया, जिओ आणि एअरटेल या कंपन्यांच्या तुलनेत BSNL चे रिचार्ज कमी पैशात उपलब्ध असल्याने ग्राहकवर्ग सुद्धा सध्याच्या या महागाईच्या काळात BSNL ला आपलं प्राधान्य देत आहे. ग्राहकांच्या गरज लक्षात घेऊन कंपनी सुद्धा सतत स्वस्तात मस्त आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) ऑफर करत असते. आज आम्ही तुम्हाला BSNL च्या अशाच एका रिचार्ज बद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही फक्त 197 रुपयांत 70 दिवस मनसोक्त आनंद घेऊ शकता. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊयात..
BSNL चा 197 रुपयांचा रिचार्ज प्लॅन – BSNL Recharge Plan
आम्ही तुम्हाला ज्या 197 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन बद्दल सांगत आहोत त्यामध्ये BSNL आपल्या ग्राहकांना तब्बल 70 दिवसांची व्हॅलिडिटी देत आहे. या रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून दररोज 2GB इंटरनेट डेटा ग्राहक वापरू शकतात. जर हे इंटरनेट संपलं तर 40Kbps स्पीड ने इंटरनेट सुरूच राहील . याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे. मात्र फक्त १५ दिवसांसाठी या सर्व सोयी सुविधा तुम्हाला मिळतील.
BSNL चा 107 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –
बीएसएनएलचा आणखी एक स्वस्त रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) आहे ज्याची किंमत अवघी 107 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 35 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसेच बोलण्यासाठी 200 मिनिटे कॉलिंगचा लाभ मिळेल. BSNL च्या या स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून यूजर्सना 3GB इंटरनेट वापरता येईल.
BSNL चा 153 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –
बीएसएनएलच्या १५३ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये ग्राहकांना २६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यूजर्सना दररोज 1GB इंटरनेट वापरता येते तसेच या रिचार्ज प्लॅन मध्ये 100 एसएमएसची सुविधा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतोय. ज्या ग्राहकांना कमी बजेट मध्ये इंटरनेट आणि कॉलिंगचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी BSNL चे वरील सर्व रिचार्ज प्लॅन फायदेशीर ठरू शकतात.