BSNL Recharge Plan : BSNL चा ग्राहकांना दणका!! 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये मोठे बदल

BSNL Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BSNL Recharge Plan । देशी टेलिकॉम कंपनी BSNL नेहमीच त्याच्या स्वस्त रिचार्जसाठी ओळखली जाते. एअरटेल, जिओ, VI पेक्षा बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन कमी किमतीत उपलब्ध असल्याने ग्राहकांचा कल सुद्धा बीएसएनएल कडे वाढला आहे. मात्र आता याच BSNL ने आपल्या ग्राहकांना दणका दिला आहे. कंपनीने १९७ रुपयांच्या प्लॅनमध्ये काही बदल केले आहेत, ज्याचा फटका यूजर्सना बसू शकतो. हा बदल नेमका काय आहे? आणि ग्राहकांना यामुळे कशाप्रकारे तोटा होऊ शकतो हेच आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

काय बदल झाला ? BSNL Recharge Plan

बीएसएनएलच्या १९७ रुपयांच्या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना आता ४ जीबी डेटा, ३०० मिनिटे व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये, यूजर्सना आता ५४ दिवसांची वैधता मिळते. खरं तर इतर कंपन्यांची तुलना केल्यास जरी तो परवडत असला तरी यापूर्वी या प्लॅनची व्हॅलिडिटी ७० दिवसांची होती. त्यामुळे ग्राहकांना थोडा का होईना फटका आता सहन करावा लागणार आहे.

यापूर्वी कसा होता रिचार्ज ?

बीएसएनएलच्या १९७ रुपयांच्या प्लॅनमध्ये, (BSNL Recharge Plan) यूजर्सना यापूर्वीपहिल्या १५ दिवसांसाठी २ जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळत होते. महत्त्वाची बाब म्हणजे हे सिमकार्ड ७० दिवसांसाठी ऍक्टिव्ह राहत होते. आता मात्र या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना फक्त ५४ दिवसांची वैधता मिळते.

याबाबत टेलिकॉम टॉकने त्यांच्या अहवालात असे म्हटले आहे की बीएसएनएल त्यांच्या प्लॅनची वैधता कमी करून प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (एआरपीयू) वाढवत आहे. यासोबतच, कंपनी त्यांच्या ४जी नेटवर्कच्या विस्तारावर सुद्धा मोठा भर देत आहे तसेच नवनवीन यूजर्स जोडत आहे. बीएसएनएलचे म्हणणे आहे की त्यांनी आतापर्यंत देशभरात ९२ हजारांहून अधिक ४जी टॉवर बसवले आहेत. अजूनही पुढचं काम चालूच आहे.