BSNL Recharge Plan: BSNL चा परवडणारा रिचार्ज प्लॅन ; 439 रुपयांत 90 दिवसांची व्हॅलिडिटी

0
3
BSNL Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL Recharge Plan – भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन कॉलिंग आणि एसएमएसचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हे प्लॅन विशेषतः डेटा न वापरणाऱ्या युजर्ससाठी आहे, ज्यांना फक्त कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळवायचा आहे. टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने सर्व कंपन्यांना या प्रकारचे रिचार्ज प्लॅन सादर करण्याचे निर्देश दिले होते, ज्यामुळे ग्राहकांना स्वस्त रिचार्जचे अधिक पर्याय मिळावेत. तर चला जाणून घेऊयात BSNL च्या 439 रुपयांच्या प्लॅनबदल अधिक माहिती .

नवीन प्लॅनची किंमत 439 रुपये (BSNL Recharge Plan) –

बीएसएनएलच्या या नवीन प्लॅनची किंमत 439 रुपये आहे आणि त्यात 90 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, 300 फ्री एसएमएस देखील दिले जातात. मात्र, या प्लॅनमध्ये डेटा वापरासाठी कोणताही लाभ नाही. याचे मुख्य आकर्षण म्हणजे याच्या किमतीच्या तुलनेत जिओ, एअरटेल आणि व्हीआयच्या प्लॅन्सपेक्षा अधिक व्हॅलिडिटी आणि कमी पैसे द्यावे लागतात. त्यामुळे अनेक ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याची घोषणा –

बीएसएनएलने (BSNL Recharge Plan) या प्लॅनचे प्रचार करतांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याची घोषणा केली आहे. 439 रुपयांच्या या प्लॅनमुळे बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना अधिक परवडणारी आणि आकर्षक सेवा उपलब्ध करून दिली आहे, जे ग्राहकांमध्ये लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : चीनच्या AI मॉडेलची जगाला धडकी!! OpenAI, META संकटात?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज