BSNL Recharge Plan | खाजगी कंपन्यांनी त्याच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केल्यापासून बीएसएनएल सरकारी कंपनी आता चांगलीच आघाडीवर आहे. मागील काही दिवसापूर्वी एअरटेल, जिओ, VI या कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. त्यामुळे बीएसएनएल सध्या चर्चेत आहे. खाजगी कंपन्यांनी त्यांचे दरवाढ केल्यामुळे आता बीएसएनएल (BSNL Recharge Plan) नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी अनेक नवनवीन योजना आणत आहेत. अत्यंत स्वस्त दरामध्ये ते युजर्सला अनेक रिचार्ज प्लॅन देत आहे.
तुम्हीही बीएसएनएल (BSNL Recharge Plan) सिम वापरत असाल, तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण बीएसएनएलने त्यांचा एक नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केलेला आहे. ज्यामध्ये तुम्हाला 105 दिवसांची वैधता मिळत आहे. बीएसएनएलच्या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग आणि डेटाचा लाभ देखील मिळणार आहे. आता या प्लॅनबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.
कमी किमतीत जास्त फायदा
बीएसएनएलकडे सध्या अनेक प्लॅन आहेत. 70 दिवसापासून ते 395 दिवसांच्या वैद्यतेसह त्यांच्याकडे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पाहिजे तो प्लॅन तुम्ही निवडू शकता. यातच बीएसएनएल कडे 666 नवीन प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला जास्त काळाची वैधता देखील मिळते.
दररोज 2 जीबी डेटा | BSNL Recharge Plan
बीएसएनएलच्या 266 रुपयांच्या प्लॅनची वैधता 105 दिवसांची आहे. यामध्ये तुम्ही फ्री कॉलिंग करू शकता. त्याचप्रमाणे ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा मिळतो. तसेच तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस देखील असणार आहेत. अनेक लोक सध्या या प्लॅनकडे वळताना दिसत आहेत. तुम्हाला जर कमी पैशात जास्त कालावधीसाठी रिचार्ज प्लॅन पाहिजे असेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण यामध्ये दररोज 2 जीबी डेटा देखील तुम्हाला प्रदान केला जात आहे.