BSNL Recharge Plan | 3 जुलै 2024 पासून देशातील अनेक खाजगी नेटवर्क कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरामध्ये वाढ केलेली आहे. यामध्ये एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडियाने देखील त्यांच्या दरामध्ये केलेली आहे. त्यामुळे त्यांचे ग्राहक त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहे. आणि ग्राहकाचा बीएसएनएलकडे वळत आहेत. इतर खाजगी कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जमध्ये वाढ केल्याने आता बीएसएनएल (BSNL Recharge Plan) त्यांच्या ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी नवनवीन स्वस्त असे रिचार्ज प्लॅन आणत आहेत. यामुळे त्यांचे ग्राहक देखील टिकून राहतात आणि नवीन ग्राहकांना जोडले जातात.
एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनची किंमत केवळ 107 रूपये आहे. आणि या प्लॅनची तुम्हाला 35 दिवसांची वैद्यता मिळेल. अनेक कंपन्यांच्या तुलनेमध्ये ही किंमत खूपच कमी आहे. परंतु या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगऐवजी 220 मिनिटांची कॉलिंग सुविधा आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला केवळ 3 जीबी डेटा मिळणार आहे. तुम्हाला जर मोबाईल वर अगदीच कमी काम असेल तर तुम्ही बीएसएनएलचा हा रिचार्ज करू शकता. हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला ऑप्शन ठरेल.
बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांसाठी अजून एक मोठी भेट आणलेली आहे. ती म्हणजे लवकरच ते शहरात 4g सेवा सुरू केली जाणार आहे. ग्राहकांना उच्च इंटरनेट पोहोचवण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहे. त्याचप्रमाणे कंपनीने आता 5g तंत्रज्ञानाचे चाचणी देखील सुरू केलेले आहे.