BSNL Recharge Plan : सर्वसामान्यांना परवडणारा रिचार्ज प्लॅन; फक्त 108 रुपयांत महिनाभर इंटरनेटचा लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशी टेकिकॉम कंपनी असलेल्या BSNL चे रिचार्ज (BSNL Recharge Plan) हे अतिशय स्वस्त मानले जातात. जीवो, वोडाफोन आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांपेक्षा BSNL चे रिचार्ज प्लॅन परवडणारे असतात त्यामुळे सध्याच्या या महागाईच्या काळात BSNL सिमकार्ड वापरणाऱ्यांची संख्याही चांगलीच वाढली आहे. तुम्हीही BSNL चे ग्राहक असाल आणि स्वस्तात मस्त अशा रिचार्जचाय शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशा एका रिचार्ज बद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत अवघी 108 रुपये आहे.

108 रुपयांत काय काय लाभ मिळतात? BSNL Recharge Plan

BSNL च्या 108 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 1GB इंटरनेट डेटा दिला जातो. जर तुमचे इंटरनेट संपले तर तुम्ही 25 पैसे प्रति MB डेटाचा लाभ घेऊ शकता. बीएसएनएल च्या या रिचार्ज प्लॅन अंतर्गत ग्राहकांना ५०० SMS ची सुविधा दिली जाते. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांसाठी असेल त्यानंतर तुम्हाला नव्याने रिचार्ज करावा लागेल.

797 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –

तुम्हाला जर तुमचे BSNL कार्ड संपूर्ण वर्षभर सुरु ठेवायचं असेल आणि ते सुद्धा कमी पैशात.. तर तुमच्यासाठी बीएसएनएलचा ७९७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन बेस्ट राहील. या रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना दररोज 2GB हाय-स्पीड डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा मिळेल. मात्र 60 दिवसांनंतर इंटरनेटचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. बीएसएनएलचा या ७९७ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता 300 दिवसांसाठी असेल. म्हणजेच तुम्हाला सारखं सारखं रिचार्ज करायची आवश्यकता नाही. जर तुम्ही फक्त सिमकार्ड जिवंत ठेवण्यासाठी रिचार्ज करणार असाल तर हाच प्लॅन (BSNL Recharge Plan) तुमच्यासाठी जास्त उपयुक्त ठरेल.