BSNL Recharge Plan : BSNL चा परवडणारा रिचार्ज!! 397 रुपयांत मिळतोय 150 दिवस लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे Jio Airtel आणि VI सारख्या देशातील कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन महाग केल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चाप लागला आहे. अशावेळी देशी टेलिकॉम एजन्सी बीएसएनएलने आपल्या यूजर्ससाठी अनेक उत्तम रिचार्ज प्लॅन BSNL Recharge Plan) आणले आहेत. इतर कंपन्यांपेक्षा BSNL चे रिचार्ज स्वस्त असल्याने ग्राहकांसाठी ते अतिशय फायदेशीर ठरत आहे. आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशाच एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही तब्बल 150 दिवस लाभ घेऊ शकता. खास बाब म्हणजे या रिचार्ज प्लॅनची किंमत अवघी 397 रुपये आहे. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

कमी किमतीत रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) उपलब्ध असल्याने सध्याच्या या महागाईच्या काळात अनेक ग्राहक बीएसएनएल कडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना खुश करण्यासाठी कंपनी सुद्धा वेगवेगळे प्लॅन लाँच करत असते. त्यातच पार्श्वभूमीवर 397 रुपयांचा रिचार्ज ग्राहकांनाही वरदान ठरणार आहे. BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 2GB इंटरनेट डेटा देखील मिळतो.याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १०० मोफत एसएमएस ची सुविधा मिळतेय. यात एक गोष्ट लक्षात ठेवा कि, हे अतिरिक्त फायदे फक्त एका महिन्यासाठी उपलब्ध असतील. तुम्ही 30 दिवसांसाठी दररोज 2 GB डेटा वापरु शकता.

BSNL चा 797 रुपयांचा प्लान – BSNL Recharge Plan

397 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन शिवाय तुम्ही बीएसएनएलचा 797 रुपयांचा प्लान देखील वापरून पाहू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला 300 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तुम्ही जर इट टेलिकॉम कंपन्यांचा विचार केल्यास Jio आणि Airtel सारख्या मोठमोठ्या आणि मुरलेल्या कंपन्या तुम्हाला फक्त 84 दिवस किंवा 90 दिवसांची व्हडिलिटीची सुविधा देतात अशावेळी त्याच किमतीत BSNL तुम्हाला 300 दिवसांची व्हॅलिडिटी देत असेल तर ग्राहकांसाठी ही नक्कीच परवडणारी गोष्ट आहे.