BSNL Recharge Plan : 7 रुपयांच्या खर्चात दररोज 3GB डेटा; BSNL प्लॅन बाजारात घालतोय धुमाकूळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BSNL Recharge Plan । जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन महाग केल्यानंतर पैसे वाचवण्यासाठी अनेक ग्राहकांनी BSNL चे सिम खरेदी करण्यावर भर दिला आहे. बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन अतिशय स्वस्त असून सध्याच्या महागाईच्या काळात सर्वसामान्याना खरा आधार बीएसएनएल मुळे मिळत आहे. त्याचमुळे मागील महिन्यापासून बीएसएनएलचे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तुमच्याकडे सुद्धा BSNL सिम असेल आणि तुम्ही सुद्धा स्वस्तात मस्त रिचार्जच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही अवघ्या 7 रुपयांच्या खर्चात दररोज 3GB इंटरनेट डेटाचा लाभ घेऊ शकता. चला तर मग हा रिचार्ज प्लॅन कोणता आहे? त्यात कोणकोणते फायदे मिळतात याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

BSNL चा 599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन– BSNL Recharge Plan

आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लॅन बद्दल सांगत आहोत तो आहे बीएसएनएलचा हा ५९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन … हा मोबाईल रिचार्ज प्लॅन ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. या प्लॅन मध्ये ग्राहकांना दररोज अनलिमिटेड कॉलिंग,100 एसएमएस, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसाला 3GB इंटरनेट डेटाचा आनंद घेता येतोय. ५९९ आणि ८४ दिवसांचे गणित बघितलं तर दिवसाला अवघ्या ७ रुपयांचा खर्च तुम्हाला पडेल, याबदल्यात तुम्ही 3GB इंटरनेट वापरू शकता. तुम्ही बीएसएनएलचा हा प्लॅन बीएसएनएल सेल्फकेअर ॲपद्वारे खरेदी करू शकता.

BSNL चा 797 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

BSNL चा आणखी एक रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) आहे तो म्हणजे 797 रुपयांचा… या रिचार्ज प्लॅन मध्ये 300 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री व्हॉईस कॉलिंग मिळेल. प्लॅन सुरू झाल्यापासून ६० दिवसांत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच दररोज २ जीबी डेटाही मिळतो. या ६० दिवसांच्या कालावधीत तुम्हाला मोफत एसएमएसची सुविधा मात्र मिळणार नाही. इतकंच नव्हे तर पहिल्या 60 दिवसांनंतर, ग्राहकांना आउटगोइंग कॉल करता येणार नाही. परंतु समोरून तुम्हाला कॉल येऊ शकतात.