BSNL Recharge Plan : BSNL चा स्वस्तात मस्त रिचार्ज; 7 रुपयांच्या खर्चात रोज 3GB डेटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BSNL Recharge Plan : प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी BSNL आपल्या ग्राहकासांठी नेहमीच स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन आणत असते. जिओ आणि एअरटेल या आघाडीच्या कंपन्यांपेक्षा BSNL चे रिचार्ज स्वस्त असल्याने ग्राहकवर्ग सुद्धा कंपनीकडे आकर्षित होत असतो. ग्राहकांना कमी पैशात जास्तीत जास्त सेवा देन्याचा BSNL चा प्रयत्न असूनही आताही कंपनीने असाच एक रिचार्ज प्लॅन आपल्या ग्राहकांना भेट म्हणून आणला आहे. BSNL च्या या रिचार्ज प्लॅन अंतर्गत तुम्हाला दररोज ३ GB इंटरनेटचा लाभ घेता येईल. आणि महत्वाचे म्हणजे यासाठी खर्च सुद्धा दिवसाला अवघे ७ रुपये इतकाच पडतोय. कसे ते आम्ही सांगतो…..

आज आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लॅन बद्दल (BSNL Recharge Plan) सांगत आहोत तो म्हणजे BSNL चा ५९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन… यामध्ये तुम्हाला दररोज ३ GB इंटरनेट वापरता येईल. या रिचार्ज प्लॅनची मुदत ८४ दिवस आहे. म्हणजेच जर हिशोब केला तर तुम्हाला दिवसाला फक्त ७ रुपये खर्च येईल. म्हणजेच सर्वसामान्य माणसाला सुद्धा परवडणारा असा हा रिचार्ज प्लॅन आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ५९९ रुपयांचा रिचार्ज करून तुमचे पैसे वाचवू शकता आणि सर्व सुविधांचा लाभ सुद्धा घेऊ शकता.

५९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन मध्ये काय खास आहे – BSNL Recharge Plan

BSNL च्या ५९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला जस आम्ही सांगितलं त्याप्रमाणे दररोज ३ GB इंटरनेट तर मिळेलच… याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएसचा लाभ मिळणार आहे. ज्या ग्राहकांना जास्तीत जास्त इंटरनेटचा वापर करावा लागतो, त्या ग्राहकांना BSNL हा रिचार्ज प्लॅन नक्कीच परडवणारा आहे. तसेच एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला ८४ दिवस रिचार्ज करायचं टेन्शन सुद्धा नाही ते वेगळंच.