हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अलीकडेच देशातील एअरटेल, जिओ, वोडाफोन- आयडिया सारख्या इतर टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमतीमध्ये वाढ केल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. या परिस्थितीत स्वस्तात मस्त रिचार्ज साठी प्रसिद्ध असलेल्या BSNL आपल्या यूजर्ससाठी नवीन नवीन प्लॅन घेऊन येत आहे. ज्यामुळे ग्राहकांना कमी किमतीमध्ये सेवा मिळतील . आज सुद्धा आम्ही तुम्हाला BSNL च्या अशा एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत ३४५ रुपये असून या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोजचा डेटा, आणि कमी खर्चात जास्त फायदे मिळत आहेत. चला तर मग या रिचार्ज प्लॅन बदल अधिक माहिती जाणून घेऊयात .
स्वस्त आणि स्पर्धात्मक प्लॅन-
BSNL च्या या ३४५ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी ही 60 दिवसांची असून त्यामध्ये दररोज 1 GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स, आणि रोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळणार आहे. हा रिचार्ज फक्त 345 रुपयांत असल्याने या प्लॅनचे दिवसाचे गणित केल्यास दररोजचा खर्च फक्त 5.75 रु इतका असणार आहे. या प्लॅनची सर्वात जबदस्त सेवा म्हणजे दररोजचा डेटा संपल्यानंतरही इंटरनेट सेवा सुरू राहील, पण स्पीड मात्र 40 Kbps इतकी कमी होईल.ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांसाठी स्वस्त दरात हि सेवा मिळणार आहे. BSNL चा नवीन प्लॅन त्याच्या दररोजच्या खर्चाच्या दृष्टीने तसेच खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहे.तो सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडेल असा आहे . ज्यामध्ये ग्राहकांना स्वस्त आणि उत्कृष्ट सेवा मिळेल.
BSNL चा 150 दिवस व्हॅलिडिटीचा प्लॅन –
याशिवाय बीएसएनएनलचा आणखी एक स्वस्त प्लॅन आहे तो म्हणजे 397 रुपयांचा रिचार्ज प्लॅन…. होय, BSNL ग्राहकांसाठी 150 दिवस व्हॅलिडिटीचा प्लॅन घेऊन आली आहे, तो प्लॅन 397 रुपयांचाअसून 30 दिवसांपर्यंत अनलिमिटेड फ्री कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि 100 SMS उपलब्ध असणार आहे. तसेच डेटा संपल्यानंतरही 40 Kbps स्पीडने इंटरनेट वापरता येईल. या प्लॅनमध्ये संपूर्ण देशभरात फ्री रोमिंगची सेवा प्रदान करण्यात आली आहे . 397 रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन जास्त कालावधीसाठी फायदेशीर आहे.