BSNL Recharge Plans : BSNL ने लाँच केले 2 स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन; फक्त 58 रुपयांत घ्या मजा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही देशी टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच स्वस्तात मस्त असे रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plans) आणत असते. ग्राहकांना कमी पैशात जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याकडे कंपनीचा कल असतो. इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा BSNL चे रिचार्ज स्वस्त असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा ते परवडतात. आताही बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी ले २ स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या दोन्ही रिचार्ज प्लॅनची किंमत 58 रुपये आणि 59 रुपये आहे. चला आज आपण या दोन्ही प्लॅन्स बाबत संपूर्ण डिटेलस जाणून घेऊयात….

58 रुपयांचा प्लॅन –

बीएसएनएलचा 58 रुपयांचा प्लॅन केवळ डेटा टॉप-अप आहे. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये आधीच कोणता तरी रिचार्ज प्लॅन हा ऍक्टिव्ह असायला हवा. ५८ रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला ७ दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज २GB इंटरनेट डेटाचा लाभ घेता येईल. जर तुमचं २GB इंटरनेट संपले तर ४० Kbps इतक्या स्पीडने तुम्ही नेट चालवू शकता.

59 रुपयांचा प्लॅन– BSNL Recharge Plans

बीएसएनएलचा दुसरा प्रीपेड प्लॅन 59 रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला ७ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात आली आहे. 59 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन अंतर्गत ग्राहकांना दररोज 1GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा आहे, परंतु SMS उपलब्ध नाही. तुम्हाला जर जास्त दिवसाच्या वैधतेचा प्लॅन हवा असेल तर तुम्ही बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

BSNL लवकरच सुरु करणार 4G सर्व्हिस –

दरम्यान, BSNL लवकरच 4G सर्व्हिस सुरु करणार आहे. येत्या ऑगस्टपासून देशात आपली 4जी सेवा सुरु होणार असल्याचे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. BSNL 4G चा स्पीड 40-45mbps पर्यंत असू शकतो असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत BSNL 4G सेवा सुरू करण्यात थोडी मागे आहे, परंतु आपल्या ग्राहकांना कमी पैशात रिचार्ज प्लॅन ऑफर (BSNL Recharge Plans) करण्यात कंपनी नेहमीच अग्रेसर असते.