BSNL Recharge Plans : BSNL चा 160 दिवसांचा रिचार्ज प्लॅन!! Jio लाही टाकतोय मागे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३ जुलैपासून जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेली जनता आता रिचार्ज प्लॅनच्या वाढत्या किमतींनी हैराण झाली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक पैसे वाचवण्यासाठी BSNL कडे वळत आहेत. कमी खर्च असल्याने आजकाल बीएसएनएलचा रिचार्ज करणे (BSNL Recharge Plans) सर्वसामान्य ग्राहकांना परवडत आहेत. आज आम्ही तुम्हाला BSNL च्या अशाच एका रिचार्ज बद्दल सांगणार आहोत ज्याची व्हॅलिडिटी 160 दिवस आहे. हा रिचार्ज प्लॅन 997 रुपयांचा असून जिओला सुद्धा मागे टाकत आहे. चला तर सविस्तर तुलना करूनच पाहुयात…

BSNL चा 997 रुपयांचा रिचार्ज– BSNL Recharge Plans

BSNL च्या 997 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 GB हायस्पीड इंटरनेट डेटा वापरायला मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ घेता येईल. हा रिचार्ज प्लॅन 160 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येत असून यामध्ये काही ॲप्सचा विनामूल्य ऍक्सेस सुद्धा मिळतोय. 160 दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज 2GB इंटरनेट म्हणजेच या रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना 320 GB हायस्पीड इंटरनेटचा लाभ मिळतोय.

Jio चा 999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

दुसरीकडे जिओच्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB हायस्पीड डेटा, दररोज 100 SMS आणि फ्रि मध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. परंतु जिओच्या या रिचार्जला फक्त 98 दिवसांची व्हॅलिडिटी मिळतेय. म्हणजेच BSNL शी तुलना करायचं झाल्यास खुपच कमी दिवसांसाठी हा प्लॅन चालेल. आणि 2GB डेटा तो पण फक्त 98 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह म्हणजेच एकूण 196GB हाय स्पीड डेटा ग्राहकांना वापरायला मिळेल. BSNL कंपनीच्या प्लानमध्ये Jio पेक्षा 124 GB जास्त इंटरनेट डेटा मिळतोय आणि व्हॅलिडिटी सुद्धा जास्त असल्याने सतत रिचार्ज करायचं टेन्शन नाही. त्यामुळे BSNL चा रिचार्ज (BSNL Recharge Plans) जिओ पेक्षाही परवडणारा म्हणता येईल.