हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत संचार निगम लिमिटेड BSNL हि देसी टेलिकॉम कंपनी आपल्या स्वस्त रिचार्जसाठी (BSNL Recharge Plans) ओळखली जाते. जिओ, एअरटेल सारख्या आघाडीच्या कंपन्यांपेक्षा बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन किती तरी पटीने कमी असतात. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी मागील काही दिवसापासून अनेक ग्राहक बीएसएनएल कडे वळत आहेत. आज आम्ही तुम्हाला BSNL च्या अशाच एक रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत, ज्यामाध्यमातूम तुमचं सिम कार्ड तब्बल १६० दिवस म्हणजे ५ महिने ऍक्टिव्ह राहू शकत. कंपनीच्या या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना दररोज २ जीबी डेटासह इतर अनेक फायदे मिळतात. BSNL चा हा रिचार्ज प्लॅन आहे तरी कोणता हेच आपण आजच्या बातमीतून जाणून घेऊयात….
BSNL चा 160 दिवसांचा प्लॅन– BSNL Recharge Plans
BSNL चा हा रिचार्ज प्लॅन ९९७ रुपयांना येतो. यामध्ये तुम्ही १६० दिवस लाभ घेऊ शकता. म्हणजेच ग्राहकांना दररोज फक्त ६ रुपये खर्च करावे लागतील. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅन मध्ये (BSNL Recharge Plans) ग्राहकांना संपूर्ण भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळेल. याशिवाय, या प्लॅनमध्ये यूजर्सना फ्री मध्ये राष्ट्रीय रोमिंगचा लाभ देखील दिला जात आहे. बीएसएनएलच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये, ग्राहकांना दररोज २ जीबी हाय स्पीड इंटरनेट डेटा मिळतो. म्हणजेच १६० दिवसात ग्राहकांना एकूण ३२० जीबी इंटरनेट वापरता येईल. तसेच दररोज १०० मोफत एसएमएसचा फायदा देखील मिळतो. बीएसएनएलने अलीकडेच BITV सेवा सुरू केली आहे, ज्यामध्ये यूजर्सना ३५० हून अधिक लाईव्ह टीव्ही आणि अनेक ओटीटी अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
बीएसएनलचा मोर्चा 5G कडे –
स्वस्त रिचार्ज प्लॅनसोबतच, BSNL आपल्या यूजर्सना चांगले नेटवर्क देण्यासाठी देखील काम करत आहे. कंपनीने या वर्षी जूनपर्यंत देशभरात १ लाख नवीन ४जी मोबाईल टॉवर बसवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, त्यापैकी ८० हजारांहून अधिक ४जी टॉवर्स सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय, बीएसएनएल या वर्षी जूनमध्ये आपली 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. BSNL ची 5G सर्व्हिस सुरु झाल्यास जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सारख्या कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.




