हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BSNL Sim Card । देशी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL ने ग्राहकांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वीपासून बीएसएनएल सर्वात स्वस्त रिचार्ज देत ग्राहकांना दिलासा देत आहेच, परंतु आता बीएसएनएलने ग्राहकांसाठी घरपोच सिमकार्ड विक्री करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच काय तर आता तुम्हाला बीएसएनएलचे सिमकार्ड खरेदी करण्यासाठी बीएसएनएल ऑफिस वर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरात बसूनही सिम कार्ड खरेदी करू शकता. यासाठी नेमकी काय प्रोसेस आहे ते आधी जाणून घेऊयात
बीएसएनएलने एक ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे, ज्याच्या मदतीने ग्राहकांना घरपोच सिम कार्ड डिलिव्हरी मिळेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही नवीन नंबर मिळवू शकता किंवा तुमचा जुना नंबर बीएसएनएलला पोर्ट देखील करू शकता. त्यात प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. बीएसएनएलने उचललेल्या या पाऊलामुळे जिओ, एअरटेल आणि व्हीआय सारख्या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
अशाप्रकारे करा खरेदी – BSNL Sim Card
सर्वात आधी बीएसएनएलची अधिकृत वेबसाइट किंवा सेल्फकेअर पोर्टलला भेट द्या.
आता ‘नवीन कनेक्श’न पर्यायावर क्लिक करा आणि प्रीपेड किंवा पोस्टपेड निवडा.
यानंतर तुम्हाला केवायसी तपशील भरावे लागतील. त्यासाठी आधार कार्ड नंबर, नाव आणि पत्ता यासारखी माहिती ऍड करा.
आधार कार्डची स्कॅन केलेली प्रत आणि फोटो अपलोड करा. BSNL Sim Card
ऑनलाइन पेमेंटद्वारे शुल्क भरा (डेबिट / क्रेडिट कार्ड किंवा UPI ).
यानंतर डिलिव्हरी साठी वेळ आणि ठिकाण निवडा
किती वेळ लागतो? खर्च किती?
एकदा का तुम्ही वरील प्रोसेस पूर्ण केली कि यानंतर ४८ ते ७२ तासांच्या आत बीएसएनएल सिम तुमच्या घरी पोच (BSNL Sim Card) होईल. या सिमकार्डची किंमत १०० ते ३०० रुपये असेल. सुरुवातीला रिचार्ज प्लॅन सह तुमच्याकडून पैसे घेतले जातील.