BSNL Sim Card : आता घरबसल्या खरेदी करा BSNL सिमकार्ड; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एअरटेल, जिओ सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या किमती महाज केल्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी अनेकजण देशी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडे (BSNL Sim Card) वळू लागलेत. बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन अतिशय कमी पैशात उपलब्ध असल्याने ग्राहकांना ते चांगलंच परवडते. सध्या BSNL ने संपूर्ण देशभरात आपली 4G सेवा पुरवण्यास सुरुवात केली असून याशिवाय कंपनी आपल्या 5G नेटवर्कवर सुद्धा काम करत आहे. त्यामुळे बीएसएनएल सिमकार्ड खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. तुम्ही सुद्धा बीएसएनएल सिम खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर हि बातमी कास तुमच्यासाठी आहे. कारण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने सिमकार्ड कस खरेदी करायचे ते आज आम्ही तुम्हाला अतिशय सोप्प्या भाषेत सांगणार आहोत.

इतर दूरसंचार कंपन्यांप्रमाणे, BSNL नेही prune नावाच्या कंपनीसोबत पार्टनरशिप करून सिम कार्ड वितरणाचे काम सुरू केले आहे. तुम्हाला हे अँप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावं लागेल. अवघ्या ९० मिनिटांत मिनिटात सिमकार्ड तुमच्या दारी येईल असा कंपनीचा दावा आहे. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा- BSNL Sim Card

सर्वात आधी prune.co.in या वेबसाइटला भेट द्या.
यानंतर येथे Buy SIM Card या पर्यायावर क्लिक करा. आणि देशाची निवड करताना भारताच्या नावावर क्लिक करा.
आता तुम्हाला ऑपरेटरसाठी बीएसएनएल निवडावे लागेल. निवडल्यानंतर, तुम्हाला तुमची योजना निवडावी लागेल.
यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल ज्यावर एक OTP येईल. OTP भरण्यासोबतच त्याठिकाणी आवश्यक माहिती भरा.
यानंतर तुमचा पत्ता टाका.
आता तुम्हाला पेमेंट करावे लागेल. ऑर्डर नक्की होताच तुमचं नवीन BSNL सिम कार्ड अवघ्या 90 मिनिटांत तुमच्या घरी येईल.
यानंतर घरबसल्या केवायसी केली जाईल आणि तुमचं सिमकार्ड ऍक्टिव्ह होईल.
मात्र सध्या कंपनी फक्त हरियाणातील गुरुग्राम आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात ही सुविधा देत आहे. महाराष्ट्रात अजून हि सेवा सुरु झालेली नाही.

दरम्यान, ऑक्टोबर 2024 पर्यंत BSNL कडून देशभरात सुमारे 80 हजार टॉवर बसवले जातील अशी माहिती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली होती. तर मार्च 2025 पर्यंत आणखी हजार टॉवर बसवले जातील असं त्यांनी म्हंटल होते. म्हणजेच एकूण 1 लाख BSNL टॉवर देशात उभारले जातील. सध्या जरी BSNL 4G सेवा देत असली तरी कंपनी 5G इंटरनेटवर सुद्धा काम करत आहे. बीएसएनएलचे नवीन 5G सिमकार्डची झलक सुद्धा काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यामुळे येत्या काळात Jio-Airtel ला टक्कर देत BSNL जोरदार मुसंडी *BSNL Sim Card) मारण्याची शक्यता आहे.