BSNL TATA Deal | BSNL ने TATA सोबत केला मोठा करार; युजर्सला मिळणार सुपरफास्ट इंटरनेट सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BSNL TATA Deal | जुलै महिन्याच्या सुरुवातीला जिओ, एअरटेल आणि व्हीआय यांसारख्या लोकप्रिय टेलिफोन कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. त्यामुळे त्यांचे युजर्स देखील मोठ्या प्रमाणात नाराज झालेले आहेत. अशातच आता अनेक युजर्स हे सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे वळताना दिसत आहे. बीएसएनएल अत्यंत स्वस्त दरामध्ये मोबाईल रिचार्ज प्रदान करत असते. अशातच आता बीएसएनएल आणि टाटा (BSNL TATA Deal) यांनी एक करार केला आहे. त्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत.

बीएसएनएल सध्या सर्वत्र त्यांची 4G सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी बीएसएनएल आणि टाटा यांनी एक करार केला आहे. या कारणामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. टाटा कंपनी ही बीएसएनएलसाठी एक आता मोठे डाटा (BSNL TATA Deal) सेंटर चालू करत आहे. यामध्ये टीसीएस आणि बीएसएनएल यांच्यातील करारानुसार 4G इंटरनेटसाठी डाटा सेंटरचे काम टाटा कंपनी करत आहे. बीएसएनएल ही कंपनी सध्या खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी काम करत आहे. खेड्यापाड्यातल्या युजर्सला देखील इंटरनेट सेवा चांगल्या गतीने मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठीच टीसीएसचे हे डेटा सेंटर चालू होत आहे.

डेटा सेंटर कधी चालू होणार | BSNL TATA Deal

बीएसएनएल कंपनीने त्यांची 4G सेवन नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आतापर्यंत जवळपास 25 हजार साइट ते काम पूर्ण केलेले आहे. यामध्ये असे सांगण्यात आलेली आहे. की BSNL 4G सेवा ही 15 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण देशभरात सुरू केली जाऊ शकते. त्यानंतर आता देशभरात 5G नेटवर्क सुद्धा तयार केले जाणार आहे. म्हणजेच BSNL चे नेटवर्क संपूर्ण देशभरात अत्यंत वेगाने पसरणार आहे. आणि नागरिकांना त्याचा लाभ देखील घेता येणार आहे.

बीएसएनएल लवकरच त्यांची 4 G सेवा लॉन्च करणार आहे. आणि 5G सेवा देखील लॉन्च करण्यासाठी कंपनीकडून काम केले जात आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये नेटवर्क टेस्टिंगचे काम देखील सुरू आहे. यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्वतः टेस्टिंग नंतर नेटवर्कला मान्यता दिलेली आहे. आणि त्यांनी हे मान्य केलेले आहे की, ही 5G सेवा सुरू होण्यास वेळ झालेला आहे. पण हे नेटवर्क खूपच चांगले असणार आहे. त्यामुळे जे बीएसएनएलचे ग्राहक आहेत, त्यांना हा मोठा फायदा होणार आहे.