हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) आपल्या घरावर टॉवर (BSNL Tower) बसवण्यासाठी दर महिन्याला ५० हजार रुपये आणि ऍडव्हान्स मध्ये ३५ लाख रुपये देत आहे असा फोन कॉल तुम्हाला आला तर नक्कीच तुम्ही खुश व्हाल आणि या गोष्टीला तयार सुद्धा व्हाल कारण दर महिन्याला तुम्हाला कोणतेही काम न करता पैसे मिळतील. मात्र खुद्द BSNL ने याबाबत इशारा देत अशा प्रकारे कोणतीही योजना कंपनीची नसल्याचे स्पष्ट केलं आहे. तसेच याबाबत नागरिकांना जागरूक राहण्याचा इशारा सुद्धा दिला आहे. बीएसएनएलच्या नावाखाली लोकांचे वैयक्तिक आणि बँक तपशील देऊन नागरिकांची फसवणूक करणे हा सदर फ्रॉड लोकांचा उद्देश असल्याचे कंपनीने म्हंटल आहे.
बीएसएनएलने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर याबाबत ट्विट करत सांगितलं कि, https://bsnltowerindia.com/page/about-us.html या बनावट वेबसाइटचा बीएसएनएलशी कोणताही संबंध नाही. ग्राहकांनी सावधगिरी बाळगा आणि या बनावट वेबसाइटमध्ये अडकू नका. ही वेबसाईट लोकांना टॉवर बसवण्याच्या बदल्यात अनेक फायदे देण्याचे अमिश दाखवते . 5G टॉवर्सच्या नावाखाली पैसे उकळण्याचा हा प्रयत्न असू शकतोय. या ट्विट मध्ये एक स्क्रिन शॉट सुद्धा टाकण्यात आला आहे त्यामध्ये ३ प्लॅन दिसत आहेत. एक ग्रामीण पॅकेज, दुसरे निमशहरी पॅकेज आणि तिसरे शहरी पॅकेज. यामध्ये 25 ते 35 लाख रुपये ॲडव्हान्स आणि दरमहा 25 ते 55 हजार रुपये भाडे सांगण्यात आले आहे. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे.
बनवत वेबसाईट कशी ओळखायची?
वेबसाइट पत्ता तपासा: वेबसाईटचा पत्ता “https://” ने सुरू होतो आणि वेबसाइटचे नाव बरोबर असल्याची खात्री करा. फसवणूक करणारे अनेकदा योग्य वेबसाइटच्या नावात किरकोळ बदल करतात.
टायपिंगच्या चुका तपासा: बनावट वेबसाइट्समध्ये अनेकदा स्पेलिंग चुका असतात. वेबसाइटच्या सामग्री किंवा पत्त्यातील कोणत्याही विसंगतीकडे लक्ष द्या.
वेबसाइट गुणवत्ता तपासणी:जर तुम्हाला आलेल्या वेबसाईटवर खराब डिझाइन, कमी रिझोल्यूशन असलेले फोटो , चुकलेली डिझाईन असेल तर समजून घ्या कि त्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे.