Bucket Water Heater: अंघोळीला येणार मजा; ‘या’ बादलीत थंड पाणी ओता आणि गरम पाणी मिळवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bucket Water Heater :– सद्यस्थितीत कडाक्याची थंडी पसरली असून अशा परिस्थितीत सकाळी लवकर अंघोळ करणे त्रासदायक आहे. त्यामुळे सकाळी अंघोळीला गरम पाणी मिळाले तर बरे वाटते. थंडीच्या दिवसांत त्यामुळेअंघोळीला सर्वजण गरम पाणी घेणे पसंत करतात. त्यामुळे प्रत्येक घरांमध्ये गिझरसारखी उपकरणे वापारली जातात. तसेच यासाठी वॉटर हीटरचा वापर सर्रास केला जातो. परंतु इलेक्ट्रिक वाॅटर हिटर शारीरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या धोकादायक आहे. कारण वीज बिलाचा प्रश्न उद्भवतो. त्यातच जर आम्ही म्हंटल कि. थंडीच्या दिवसांत थंड पाणी एका बादलीत टाका आणि गरम पाणी अंघोळीसाठी घ्या तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. परंतु असे नवीन उपकरण आता बाजारात आले आहे. बाजारात या बादलीला ‘गिझर बकेट’ या नावाने ओळखले जाते. या बादलीबद्दल सर्व काही आपण जाणून घेणार आहोत.

सध्या बाजारामध्ये ‘गिझर बकेट’ विक्रीसाठी आले असून या बादलीला लोकांची भलतीच पसंती दिसून येत आहे. ज्या लोकांना बाजारात गिझर घेणे परवडणार नाही, ते लोक पर्यायी व्यवस्था म्हणून या गिझर बकेट अर्थात बादलीकडे आशेने पहात आहेत. ही बादली मजबूत असून यात 20 लिटरची पाणी मर्यादा आहे. थंड पाणी ओतल्याबरोबर यातून गरम पाणी आपल्याला मिळवता येते. आहे की नाही गंमत ? गिझर बकेट अर्थात बादलीमुळे फक्त अंघोळ करणेनाही तर तुमची अनेक कामे सोपी होणार आहेत. या बादलीत तुम्ही अंघोळ करू शकता, हिवाळ्यात थंड पाण्यात कपडे धुण्यापेक्षा गरम पाण्यात कपडे धुवू शकता. तसेच घरगुती कामासाठी या पाण्याचा वापर करणे तुम्हाला सोपे होईल.हिवाळ्यात गरम पाण्याअभावी अनेक समस्या निर्माण होतात, यावर गिझर बकेट हा पर्याय स्वस्त आणि चांगला आहे.

बादलीची रचना ?

गिझर बादली हे उत्पादन नुकतेच बाजारात आले असून त्याला एक हिटर जोडलेला आहे. एक व्यक्ती आरामात या बादलीतील पाण्यात अंघोळ करणार आहे , एवढी बादलीची क्षमता आहे. तसेच या बादलीत शॉकप्रूफ तंत्रज्ञान म्हणजे विजेचा धक्का बसणार असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुले लोकांची या बादलीला उत्स्फूर्त पसंती मिळत आहे. बादलीतील गरम पाण्याचा वापर थंडीत भांडी धुण्यासाठी होऊ शकतो. या बादलीला एक टॅप देण्यात आलेली आहे व या टॅप मधून गरम पाणी मिळते.

किती आहे गिझर बकेटची किंमत?

तुम्हाला ही गरम पाणी देणारी गिझर बकेट बाजारपेठेतील दुकानांत मिळणार आहे. तसेच फ्लिपकार्टवर ही गिझर बकेट ऑनलाईन खरेदी करून घरी मागवता येऊ शकते. फ्लिपकार्टमार्फत ही बादली ऑनलाईन खरेदी केल्यावर ग्राहकाला 36 टक्के सूट मिळणार आहे. बादलीची मूळ किंमत ही 2499 रुपये इतकी आहे. म्हणजे जवळपास अडीच हजार आहे. मात्र फ्लिपकार्टवरून ही बादली खरेदी केली असता ती 100 रुपयांमध्ये मिळेल.