Budget 2024 Date and Time : अर्थमंत्री कधी सादर करणार बजेट? पहा वेळ आणि थेट प्रक्षेपण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Budget 2024 Date and Time : देशाच्या अर्थमंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या वर्षी भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प म्हणजे तात्पुरती आर्थिक योजना किंवा ‘व्होट ऑन अकाउंट’ असणार आहे. तरीही देशातील जनतेला, शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना तसेच करदात्यांना या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतील. तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकार जनतेला खुश करण्यासाठी मोठमोठ्या घोषणाही करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प किती वाजता सादर होणार?? तसेच अर्थमंत्र्यांचे भाषण लाइव्ह कुठे बघायला मिळणार? याबाबत माहिती असं आवश्यक आहे.

किती वाजता सादर होणार अर्थसंकल्प – Budget 2024 Date and Time

दरवर्षी प्रमाणे यंदाही १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर (Budget 2024 Date and Time) करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ साधारणत: सकाळी ११ वाजता असते. त्याचवेळी अंतरिम अर्थसंकल्पही सादर केला जाणार आहे. यंदा लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांत आली असल्याने सरकार अर्थसंकलप्त कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतूद करत हे पाहायला हवं तसेच कोणत्या वर्गाला आर्थिक सवलत मिळते?? सरकार कोणत्या नव्या योजनांची घोषणा करते याकडे सुद्धा देशवासीयांचे लक्ष्य लागलेलं आहे.

अर्थसंकल्प कुठे लाईव्ह पाहता येणार?

तुम्ही टीव्ही वर अगदी सुरुवातीपासून अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. यासाठी दूरदर्शन, संसद टीव्ही, देशातील विविध न्यूज चॅनल्स याशिवाय अर्थ मंत्रालयाच्या YouTube चॅनेल वर सुद्धा तुम्हाला हा अर्थसंकल्प पाहायला मिळू शकतो.