Budget 2024: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. 2024 – 25 या आर्थिक वर्षातील या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या युवक, कृषी क्षेत्र, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या गेल्या. देशाच्या विकासामध्ये पर्यटन क्षेत्राची भूमिका मोठी आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या काही घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये केल्या आहेत. त्या नक्की कोणत्या आहेत कोणत्या राज्यांच्या क्षेत्रांना विकासाची (Budget 2024) संधी आहे चला जाणून घेऊयात.
नालंदा विकास
देशाच्या सभ्यतेचा एक भाग म्हणून पर्यटनाचे क्षेत्र महत्वाचे असल्याचे , अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण करता येतील, तसेच इतर क्षेत्रांमध्येही संधी उपलब्ध होतील असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी बिहारमधील राजगीर आणि नालंदा या क्षेत्राचा विकास करणार असल्याची घोषणा केली. नालंदा पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले जाईल. नालंदामध्ये अनेक ठिकाणे आहेत ज्यांचा विकास करून पर्यटनाला चालना मिळू शकते. असे त्यांनी नमूद केले. यासाठी नालंदा विद्यापीठात नुकतेच नवीन कॅम्पस सुरू करण्यात आले. आता नव नालंदा महाविहार, सूर्य मंदिर, नालंदा पुरातत्व संग्रहालय, ह्युएन त्सांग मेमोरियल हॉल इत्यादी नालंदा पर्यटन केंद्रांतर्गत (Budget 2024) आणण्याची योजना आहे.
महाबोधी मंदिर (Budget 2024)
काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रमाणेच बिहारमधील बोधगया येथे महाबोधी मंदिर बांधले जाणार आहे. युनेस्कोने महाबोधी विहारला जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. सरकार या ठिकाणाचा पर्यटनासाठी विकास आणि प्रोत्साहनही देईल.
विष्णुपद मंदिर
बिहारच्या विष्णुपद मंदिरालाही वाराणसीच्या काशी विश्वनाथप्रमाणे मंदिर कॉरिडॉर बनवले जाईल. राजगीरलाही खूप महत्त्व आहे. राजगीरच्या विकासासाठीही मदत (Budget 2024) केली जाईल
ओडिशा पर्यटनाला चालना (Budget 2024)
पुरीचे जगन्नाथ मंदिर, कोणार्कचे सूर्य मंदिर, भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर यासह अनेक धार्मिक स्थळांसाठी ओडिशा प्रसिद्ध आहे. तथापि, येथे प्राचीन शिल्पे, नैसर्गिक लँडस्केप, वन्यजीव अभयारण्ये आणि प्राचीन समुद्रकिनारे देखील आहेत. या सर्वांना पर्यटन म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी ओडिशा येथील पर्यटन विकासाला चालना देण्याची घोषणा (Budget 2024) केली.
असे असताना आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. कोकणातल्या समुद्र किनारे , राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीने कोणतीच घोषणा करण्यात (Budget 2024) आली नाही.