हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2025 – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2025 चा अर्थसंकल्प मांडताना अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थी , नोकरदार आणि गोरगरीबांसाठी दिलासा देणारी उपाययोजना समाविष्ट आहेत. विशेषत: रुग्णांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये रुग्णांना लागणारी 36 जीवन रक्षक औषधांवरील ड्युटी टॅक्स पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे, ज्यामुळे हे औषधे सामान्य लोकांसाठी अधिक परवडणारे होणार आहेत. चला याची सविस्तर माहिती पाहुयात.
उपचारासाठीची औषधे स्वस्त होणार (Budget 2025)-
प्रत्येक जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर उभारण्यात येणार असून, कॅन्सरवरील उपचारासाठीची औषधे स्वस्त होणार आहेत. 36 जीवन रक्षक औषधांवरील ड्युटी टॅक्स पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे, ज्यामुळे हे औषधे सामान्य लोकांसाठी अधिक परवडणारे होणार आहेत.
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार –
निर्मला सीतारामन (Budget 2025) यांनी जाहीर केलं की, आगामी 5 वर्षांत देशभरातील मेडिकल कॉलेजांमध्ये 10 हजार अतिरिक्त जागा उपलब्ध करुन दिल्या जातील. यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी जागा कमी असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता अधिक विद्यार्थ्यांना सरकारी मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळवता येणार आहे आणि त्यांना महागड्या खासगी कॉलेजात शिकावे लागणार नाही.
सर्वसामान्य जनतेला दिलासा –
IIT मध्ये 6500 अतिरिक्त सीटे उपलब्ध करुन दिली जातील आणि 3 नवीन AI सेंटर उभारण्यात येणार आहेत. AI शिक्षणासाठी 500 कोटी रुपयांचं बजेट राखीव करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचं ठरवलं आहे, आणि विशेषत: आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा हे या बजेटचं मुख्य आकर्षण ठरले आहेत.