Budget 2025 :अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या बजेटमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता 6 लाख रुपयांपर्यंत भाडे देणाऱ्या भाडेकरूंना TDS भरावा लागणार नाही! यापूर्वी ही मर्यादा 2.4 लाख रुपये होती. त्यामुळे भाडेकरू आणि घरमालक दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
TDS मर्यादा वाढली (Budget 2025)
याआधी वार्षिक 2.4 लाखांहून अधिक भाडे भरताना टीडीएस कपात केली जात होती. आता ही मर्यादा 6 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे, त्यामुळे लाखो भाडेकरूंना दिलासा मिळणार आहे. मुंबई, पुणे, बंगळुरू यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये घरांचे भाडे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे 2.4 लाख टीडीएस मर्यादा खूपच कमी होती. याच पार्श्वभूमीवर ही मर्यादा वाढवण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत होती.
नवीन तरतुदीमुळे कोणाला फायदा होईल? (Budget 2025)
जर एखादा भाडेकरू वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत भाडे देत असेल, तर त्याला TDS भरावा लागणार नाही.
यापूर्वी 2.4 लाखांच्या वर भाडे असल्यास TDS कापला जात होता.
नवीन सुधारणा घरमालक आणि भाडेकरू दोघांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
नवीन कायदा – 2025-26 मध्ये लागू होणार
आयकर कायद्याच्या कलम 194-1 नुसार, भाडे उत्पन्न 2.4 लाखांपेक्षा जास्त असल्यास टीडीएस भरावा लागत असे. आता, 2025-26 च्या अर्थसंकल्पात ही मर्यादा दरमहा 50,000 रुपये (वार्षिक 6 लाख रुपये) करण्यात आली आहे.
याबाबत बजेट भाषणात माहिती देताना सीतारमण म्हणाल्या, “मी कपातीचे दर आणि मर्यादा कमी करून टीडीएसला तर्कसंगत करण्याचा प्रस्ताव ठेवते. तसेच कर कपातीची मर्यादा वाढवली जात आहे. यामुळे लहान व्यवहारांवरील टीडीएस कमी होईल, तसेच लहान भाडेकरू (Budget 2025) आणि घरमालकांना मोठा दिलासा मिळेल.”
या निर्णयामुळे घर भाड्याने देणे अधिक सोपे होणार आहे. घरमालकांना अधिक उत्पन्न मिळेल, कारण TDS कपात होणार नाही.भाडेकरूंवर कराचा बोजा कमी होईल. वाढत्या भाड्याच्या पार्श्वभूमीवर मोठा आर्थिक दिलासा मिळेल. सरकारच्या या निर्णयामुळे भाडेकरू आणि घरमालक दोघांनाही मोठा फायदा होणार आहे.




