बंगालमध्ये ‘बुलबुल’ चक्रीवादळाचा तडाखा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली प्रतिनिधी । बंगाल राज्यातील कोलकाता शहर, चोवीस परगणा व पूर्व मिदनापुर ह्या जिल्ह्यांना बुलबुल चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. सुमारे ताशी १७० किलोमीटर वेगाने वाहणारे ह्या वाऱ्यांमुळे बंगाल परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या चक्रीवादळामुळे आतापर्यंत दहा बळी गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राज्यात आगामी येऊ घातलेली नियोजित यात्रा यामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्वीट करत बंगाल राज्य सरकारला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.


Leave a Comment