Buldhana Accident : बुलढाण्यात भीषण अपघात; 5 ठार , 24 जखमी

Buldhana Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुलढाण्यातुन एका भीषण अपघाताची (Buldhana Accident) बातमी समोर येतेय. शेगाव-खामगाव महामार्गावर तिहेरी अपघात झालाय. खाजगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. यातील ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले.

कसा झाला अपघात – Buldhana Accident

मिळालेल्या माहितीनुसार, आज (2 एप्रिल) पहाटे साडेपाच वाजता जयपुर लांडे फाट्या समोर हा विचित्र अपघात झाला आहे. पुणे येथून परतवाडा येथे जाणाऱ्या एसटी बसला आधी चारचाकी वाहनाने मागून धडक दिली, त्यानंतर खाजगी ट्रॅव्हल्सने या दोन्ही वाहनांना उडवले. या तिहेरी अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र या अपघाताला जबाबदार कोण याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. अपघात झाल्यानंतर जोरदार आवाज झाला, त्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अन् जखमींना मदत केली. तत्काळ पोलिस आणि आपत्कालीन सेवांना या अपघाताबद्दल माहिती देण्यात आली.

हा अपघात (Buldhana Accident) इतका भीषण होता की यात बोलेरो कार चक्काचूर झाली आहे. तसेच इतर दोन वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. खासगी बसमध्ये त्या बसचा चालक अद्याप फसला असून त्याला बाहेर काढण्याचे काम सध्या पोलिसांकडून केलं जात आहे. सध्या घटनास्थळी पोलीस मोठ्या प्रमाणात हजार असून पुढील कारवाई केली जात आहे. दरम्यान, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. तर जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.