Bullet Train : भारतीय रेल्वे ही सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये प्रमुख पर्याय आहे. त्यामुळेच भारतीय रेल्वे विभाग आणि भारत सरकार यांच्या माध्यमातून ही सेवा आणखी सुलभ व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रेल्वे मार्ग विस्तारण्यासोबतच नवीन ट्रेन्स तसेच बुलेट ट्रेन , मेट्रो असे महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सरकारच्या अशाच महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी (Bullet Train) एक प्रकल्प म्हणजे मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प. या प्रकल्पाबाबत एक महत्वाची अपडेट आता हाती आली आहे चला जाणून घेऊया…
महाराष्ट्रातील मुंबईला गुजरातमधील अहमदाबादशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर (MAHSR) बुलेट ट्रेनची देश आतुरतेने (Bullet Train) वाट पाहत आहे. रेल्वे मंत्रालयाने बुधवारी , 7 ऑगस्ट रोजी या प्रकल्पाबाबत मोठी अपडेट शेअर केली आहे . त्यानुसार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात लक्षणीय प्रगती झाली आहे आणि मुख्य बांधकाम टप्प्यांमध्ये लक्षणीय प्रगती होत आहे आणि हा प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ आहे असे सांगण्यात आले आहे.
रेल्वे मंत्रालयाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये म्हण्टले आहे की , “देशातील पहिला #BulletTrain प्रकल्प पूर्ण होण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती, मोठ्या बांधकामाचे टप्पे सुरू आहेत.” सोबतच रेलवे मंत्रालयाने 31 जुलै 2024 पर्यंत केलेल्या अनेक महत्त्वाच्या कामाबद्दल माहिती देणारा सर्वसमावेशक अहवाल शेअर केला.
Substantial strides towards accomplishing the Nation’s first #BulletTrain project, with key construction phases underway. pic.twitter.com/EpAvrssDtH
— Ministry of Railways (@RailMinIndia) August 7, 2024
काय सांगतो अहवाल ?(Bullet Train)
- भूसंपादन: 100% अधिग्रहित. 1,390 हेक्टर जमीन.
- पिअर फाउंडेशन: 341 किलोमीटर
- घाट बांधकाम: 324 किलोमीटर
- गर्डर कास्टिंग: 231 किलोमीटर
- गर्डर लॉन्चिंग: 200 किमी
या आकडेवारी सोयाबीटाचा माहिती देताना रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे की, प्रकल्पाचे काम सुरळीत सुरू असल्याने रेल्वे रुळ टाकण्याचे कामही सुरू असून ते वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर
- मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर 1.08 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने विकसित केला जात आहे.
- MAHSR ही भारतातील पहिली बुलेट ट्रेन असेल जी गुजरात, महाराष्ट्र आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीमधून जाईल.
- ही ट्रेन 320 किमी/तास या वेगाने 508 किमी अंतर कापेल.
- 2026 पर्यंत मुंबई-अहमदाबाद मार्गावर भारतातील पहिली बुलेट ट्रेन सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वर्षी (Bullet Train) 19 मार्च रोजी केली होती.