राज्यातील वाहतूक व्यवस्थेत क्रांती; मुंबई ते नागपूर दरम्यान सुरु होणार बुलेट ट्रेन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनके दिवसापासून रेल्वे त्याच्या कामगिरीमुळे प्रचंड चर्चेत आहे. यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वेगवेगळ्या ट्रेनचे आगमन होताना दिसत आहे. काही काळापासून मुबई ते अहमदाबाद प्रकल्पानंतर आता महाराष्ट्रातील दुसऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकल्पामध्ये मुंबई ते नागपूर हा मार्ग समाविष्ट असून, यामुळे राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास सुलभ आणि वेगवान होणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडणार आहे.

मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन

मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पात 766 किमी लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे, ज्यावर बुलेट ट्रेन ताशी 350 किमी वेगाने धावेल. या मार्गावर 13 स्थानके असतील, तसेच या मार्गाचे 68 टक्के भाग समृद्धी महामार्गाच्या समांतर असेल. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामात प्रगती होत असून, 508 किमी लांबीच्या या मार्गावर 2 किमीचा भाग जमिनीखालून बोगद्यातून जाणार आहे. ठाण्यात 7 किमी लांबीचा बोगदा खोदला जात असून, टनेल बोअरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडचा वापर केला जात आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होईल.

13 प्रमुख स्थानके

नागपूर, खापरी, वर्धा, पुलगाव, करंजा लाड, मालेगाव जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, आणि शहापूर या स्थानकांवर बुलेट ट्रेन थांबणार आहे , ज्यामुळे स्थानिक प्रवाशांनाही वेगवान व सोयीस्कर प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास केवळ साडेतीन तासांत शक्य होईल. प्रवाशांसाठी हा प्रकल्प सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा नवा अध्याय ठरेल , असे बोलायला हरकत नाही .या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.