हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने नवनवीन ट्रेन भारतात आणून , मोठा विकास साधला आहे. आता देशातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठीचे ( First Bullet Train) प्रयत्न जोरदार सुरु असून , मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे (MAHSR) प्रकल्पाला गती मिळत आहे. या बुलेट ट्रेनच्या डिझाइनमध्ये भारत आणि जपानकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. बुलेट ट्रेनमध्ये भारतीय प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक सुधारणा करण्यात आल्या असून, यात वातानुकूलित सीट्स, जास्त सामान क्षमता, धुळीपासून बचाव करणारे डबे, तसेच उच्च तापमानात (50°C पेक्षा जास्त) चालण्याची क्षमता समाविष्ट आहे. त्यामुळे हि कॉरिडॉरची बुलेट ट्रेन लोकांना आरामदायी प्रवासासाठी फायदेशीर ठरणार आहे.
ट्रेनच्या डिझाइनमध्ये बदल –
भारत आणि जपानच्या सहकार्याने शिंकानसेन ट्रेनच्या डिझाइनमध्ये भारतीय परिस्थितीसाठी आवश्यक बदल करण्यात आले आहेत. एका रिपोर्टनुसार 50% हून अधिक बांधकाम पूर्ण झाले असून ट्रॅक टाकण्याचे काम सुरू आहे. प्रकल्पासाठी लागणारा रेल्वे ट्रॅक (Railway Track) जपानमधून आयात करण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत 60 किलोमीटरचा ट्रॅक टाकण्यात आला आहे. त्यामुळे उच्च प्रगती साधली जाणार आहे.
प्रवाशांसाठी बदल –
प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी कोचेसमध्ये सामान ठेवण्याची क्षमता वाढवली जाणार आहे . तसेच, धुळीपासून बचावासाठी , सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याचसोबत बैठक व्यवस्थेतही काही बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जागेचा वापर अधिक कार्यक्षम आणि योग्य होईल. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ( Mumbai Ahmedabad Bullet Train Project ) हे भारतातील हाय-स्पीड रेल्वेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच वेगाने धावणाऱ्या या ट्रेनमुळे प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे .