Bullet Train : मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेवरून धावणार बुलेट ट्रेन ! गुजरातमध्ये NE4 वर ब्रिज पूर्ण

0
2
bullet train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bullet Train : गुजरातमध्ये देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. ही बुलेट ट्रेन 1350 किमी लांब असलेल्या मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवे (NE4) वरून धावणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने गुजरातमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पाचवा PSC (प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट) (Bullet Train) ब्रिज पूर्ण केला आहे.

एक्सप्रेसवेच्या वरून धावणार बुलेट ट्रेन (Bullet Train)

हा प्रकल्प गुजरातच्या सूरत जिल्ह्यात कोसांबा परिसरात एलिवेटेड वायडक्टच्या माध्यमातून राष्ट्रीय एक्सप्रेसवे-4 पार करणार आहे. या ठिकाणी वाहनचालकांना बुलेट ट्रेन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याचा अनोखा अनुभव मिळणार आहे.

कशी असेल ब्रिजची रचना (Bullet Train)

या पुलाची 260 मीटर आहे. यामध्ये 50 मीटर + 80 मीटर + 80 मीटर + 50 मीटर अशा चार मोठ्या स्पॅनचा समावेश असणार आहे. तर 104 प्रीकास्ट सेगमेंट बॅलन्स्ड कँटिलीव्हर तंत्राचा वापर, जो मोठ्या स्पॅनसाठी उपयुक्त असेल. सूरत आणि भरूच बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान हा ब्रिज आहे. सध्याचा विचार करता मुंबई-दिल्ली राष्ट्रीय एक्सप्रेसवे-4 अजूनही बांधकामाच्या प्रक्रियेत आहे. म्हणूनच वाहतुकीचा प्रवाह सुरळीत राहावा आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही अडचण येऊ नये यासाठी बांधकाम नियोजनपूर्वक केले गेले आहे.

गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचा पहिला ट्रायल रन (Bullet Train)

गुजरातमध्ये सूरतजवळील एका स्ट्रेचवर सर्वप्रथम बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
या भागातील बांधकाम सर्वात जास्त प्रगत स्थितीत आहे.
ही बुलेट ट्रेन भारताच्या उच्च-गती रेल्वे स्वप्नाचा मोठा टप्पा ठरणार आहे. भविष्यात भारतातील प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होईल.