Bullet Train : मुंबई च्या विकासात भर घालणारे अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत तर काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत. अटल सेतू, कोस्टल रोड असे प्रोजेक्ट आहेतच. शिवाय मुंबईच्या विकासात भर घालणारा आणखी एक महत्वकांक्षी प्रकल्प म्हणजे अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन (Bullet Train). हा प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी (13 फेब्रुवारी) मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’ कॉरिडॉरचा व्हिडिओ शेअर केला, ज्यामुळे दोन्ही शहरांमधील 508 किमी मार्गावरील प्रवासाचा वेळ केवळ 2 तासांवर येईल.
काय आहे ट्विट ? (Bullet Train)
रेल्वेमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलीय. त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे की, “मोदी 3.0 मधील #बुलेटट्रेनसाठी संपर्कात रहा!” सोबत एक व्हिडिओदेखील शेअर केला असून व्हिडिओमध्ये, 1.08 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून तयार करण्यात येत असलेल्या अत्याधुनिक ट्रेन (Bullet Train) प्रकल्पाची काही वैशिष्ट्ये हायलाइट करण्यात आली आहेत. पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, हा प्रकल्प जागतिक दर्जाचा अभियांत्रिकीचा चमत्कार आणि भारताचे भविष्य असेल असे वर्णन केले आहे.
सपने नहीं हकीकत बुनते हैं!
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) February 12, 2024
Stay tuned for #BulletTrain in Modi 3.0!#ModiKiGuarantee pic.twitter.com/0wEL5UvaY8
2026 मध्ये ट्रेनची ट्रायल
मिळालेल्या माहितीनुसार, 2026 मध्ये बिलीमोरा ते सुरत दरम्यान ट्रेनची (Bullet Train) ट्रायल सुरू होणार आहे. गुजरातमध्ये त्याचा मार्ग 352 किलोमीटरचा असेल.बुलेट ट्रेन गुजरातमधील 9 जिल्हे पार करेल. महाराष्ट्रात त्याची लांबी 156 किलोमीटर असेल जिथून ती 3 जिल्हे ओलांडेल. याशिवाय नगर हवेलीतून 4 किलोमीटरचा मार्ग जाणार आहे. या कॉरिडॉरमध्ये 12 स्थानके बांधली जात आहेत.
काय आहेत बुलेट ट्रेनची वैशिष्ट्ये (Bullet Train)
- या मार्गावरील बुलेट ट्रेनचा कमाल वेग ताशी 320 किलोमीटर असेल.
- कॉरिडॉरमध्ये स्लॅब ट्रॅक सिस्टिमची सुविधा असेल. हे तंत्रज्ञान भारतात प्रथमच वापरले जाणार आहे.
- बुलेट ट्रेन मार्गासाठी 24 नदी पूल, 28 स्टील पूल आणि 7 डोंगरी बोगदे बांधले जात आहेत.
- या कॉरिडॉरमध्ये समुद्राखाली 7 किमी लांबीचा बोगदाही असेल.