Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक कधी होणार? किती टप्प्यात मतदान होण्याची शक्यता?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीसाठी कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार उभा करायचा यादृष्टीने पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने अजून तरी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. परंतु, मार्च ते एप्रिल महिन्यात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया होऊ शकते. फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल. संपूर्ण देशासाठी निवडणुका असल्याने ही मतदान प्रक्रिया एकूण ७ टप्प्यात होऊ शकते.

कधीही जाहीर होऊ शकतो निवडणुकीचा कार्यक्रम – Lok Sabha Election 2024

मागच्या वेळच्या लोकसभा निवडणुका एप्रिल-मे 2019 मध्ये झाल्या होत्या. 16 जून 2024 रोजी हा कार्यकाळ संपत आहे. तत्पूर्वी मतदान होऊन नवीन सरकार देशात स्थापन होईल. . 2019 मध्ये 7 टप्प्यात निवडणुका पार पडल्या होत्या, त्यामुळे यंदा सुद्धा 7 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने अद्याप लोकसभेसाठी मतदान कधी होईल ते जाहीर केलेलं नसलं तरी कधीही याबाबत (Lok Sabha Election 2024) घोषणा होऊ शकते. यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

देशात INDIA Vs NDA असा सामना –

यंदाच्या लोकसभेसाठी भाजपप्रणीत NDA आणि विरोधकांच्या INDIA मध्ये थेट सामना पाहायला मिळणार आहे. कोणत्याही परिस्थिती मोदींना तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी NDA कडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांपासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वच जण तयारीला लागले आहे. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत मोदींचा विजयीरथ रोखण्यासाठी विरोधक INDIA आघाडीच्या माध्यमातून रणनीती आखत आहेत. काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, दक्षिणेतील स्टॅलिन, अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी, जम्मू काश्मीर मधील ओमर अब्दुल्ला, हे विरोधी आघाडीत आहेत. मात्र जागावाटपाच्या मुद्द्यांवरून विरोधकांमध्ये अजूनही एकमत झालेलं नाही. तर आधी इंडिया आघाडीत असलेले अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा देत इंडिया आघाडीला भगदाड पाडलं.

INDIA आघाडीत कोणकोणते पक्ष –

भाजपविरोधी INDIA आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ), आरजेडी, समाजवादी पार्टी, सीपीएम, डीएमके, सीपीई, , जेएमएम, आझाद समाज पक्ष, सीपीआय (सीपीआय) यांचा समावेश आहे. ML ), UML, KMDK, MKK, MDMK, VCK, JKPD, PWP या पक्षांचा समावेश आहे.

NDA मध्ये कोणकोणते पक्ष

दुसरीकडे, भाजपप्रणीत, NDA मध्ये JDS, अकाली दल , HAM, JDU, LJP, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), NPP, RLJP, , AGP, निषाद पार्टी, MNF या राजकीय पक्षांचा समावेश आहे.