व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बैलगाडा शर्यत : रेठऱ्याचा महिब्या आणि बकासुर ठरला 19 लाखांच्या महिंद्रा थारचा मानकरी

सांगली । सध्या सर्वत्र बैलगाडा शर्यतीच्या चर्चा आहेत. बैलगाडा शर्यतींना लोकांचा उदंड प्रतिसादही मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विटा- भाळवणी (जि. सांगली) येथील भारतातील सर्वांत मोठ्या रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीत कराड तालुक्यातील रेठऱ्याचा महिब्या आणि मोईनशेठ धुमाळ यांचा बकासूर यांनी प्रथम क्रमांक पटकावत 19 लाख रूपयांची महिंद्रा थार गाडी बक्षीस म्हणून मिळवली. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यूथ फाउंडेशनच्या वतीने ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती.

रोजचा बाजारभाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

अत्यंत चुरशीच्या या बैलगाडा शर्यतीत प्रेक्षकांनी खचाखच गर्दी केली होती. सांगली जिल्ह्यातील या मैदानात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. संजय काका पाटील, खा. श्रीनिवास पाटील, कडेगाव-पलूस मतदार संघाचे आ. विश्वजित कदम, निलेश लंके, पै. संतोष आबा वेताळ, तासगावचे युवा नेते रोहित पाटील, आ. अनिल बाबर, माजी आ. आनंदराव पाटील याच्यासह राज्यातील राजकीय तसेच बैलगाडी शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. अतिशय थरारक अशी बैलगाडा शर्यत पार पडल्यामुळे उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले असे म्हणायला काही हरकत नाही. महिब्या आणि बकासुर जोडीने पुन्हा एकदा शर्यंत जिंकत थार गाडीचे ते मानकरी ठरले.

बेलगाडी शर्यतीतीत विजेत्यांची नांव, गाव व बक्षीस खालीलप्रमाणे –

प्रथम क्रमांकाची मानाची गदा, चषक आणि महिंद्रा थार गाडीचा मानकरी सदाभाऊ कदम (रेठरे ) यांचा महिब्या, बकासूर ठरला.

दुसरा क्रमांक- ट्रॅक्टर आणि चषक-1 – शंभू आणि रोमर बैलजोडी आरोही मोहन देडगे (नदिड सिटी),

तिसरा क्रमांक- ट्रॅक्टर आणि चषक वजीर आणि नियादी बैलजोडी गुड्डी रतन म्हात्रे (सागाव डोंबवली)

चतुर्थ क्रमांक- दुचाकी- निसर्ग गार्डन (कात्रज)

पाचवा क्रमांक – दुचाकी सूर्या आणि स्वार बैलजोडी नियती भिमराव भुतकर (रामसवाडी),

सहावा क्रमांक दुचाकी रणवीर पाटील (कल्याण),

सातव्या क्रमांक- सर्जा आणि रणवीर बैलजोडी- जावेद मुल्ला (तांबवे)