रेल्वे विभागात 3015 रिक्त पदांसाठी बंपर भरती; आजच करा अर्ज; सविस्तर माहिती वाचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. परंतु पदपात्रतेमुळे आणि इतर अनेक कारणांमुळे नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र आता पश्चिम मध्य रेल्वे (WCR) ने वेगवेगळ्या विभागांमध्ये एकूण 3015 शिकाऊ पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार 14 जानेवारीपर्यंत रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट wcr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

3015 रिक्त पदे भरली जाणार

15 डिसेंबरपासून पश्चिम मध्य रेल्वे अपरेंटिस भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 14 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमार्फत अपरेंटिस पदांवरील एकूण 3015 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये जनरल कॅटगरी 1224, अनुसूचित जाती 455, अनुसूचित जमात 218, ओबीसी 811 आणि ईडब्ल्यूएस 307 जागा राखीव असणार आहेत.

पात्रता

पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने दहावी परीक्षेत मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुण मिळवलेल्या असावेत. तसेच, NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे. यापेक्षा अधिक वय असणाऱ्या उमेदवाराने अर्ज केल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.

कोणत्या विभागात किती जागा रिक्त

जेबीपी डिव्हिजन विभाग – 1164 पदे
बीपीएल कॅटगरी विभाग -603 पदे
कोटा डिव्हिविजन विभाग – 853 पदे
सीआरडब्ल्यूएस बीपीएल विभाग – 170 पदे
डब्ल्यूआरएस कोटा विभाग -196 पदे
मुख्यालय/जेबीपी विभाग – 29 पदे

ऑनलाइन अर्ज शुल्क

सर्व उमेदवारांकडून अर्ज शुल्क 136 रुपये घेण्यात येईल. तसेच SC, ST, PWBD आणि महिलांसाठी अर्ज शुल्क 36 रुपये असेल.