दोन दुकाने फोडून खाद्यपदार्थांसह रकमेची चोरी; एकजण गजाआड

theft
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : सिडको भागामध्ये दोन दुकाने फोडून दुकानातील खाद्यपदार्थांसह रक्कमेची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणातील चोराला पकडण्यात गुन्हे शाखेतील पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेतील पोलिसांनी वसीम खान हबीब खान (रा. कटकट गेट) याला अटक करण्यात अली आहे.

गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे आणि त्यांच्यास सहकार्यांनी मिळून सिडको एम-2 भागात एक मसाल्याचे दुकान व ड्रायफ्रूटचे दुकानातं चोरी करण्याच्या प्रकरणात संशयित आरोपी वसीम खान हा कटकट गेट येथील के के पान सेंटर येते बसलेला असल्याची माहिती मिळाली.

या माहितीवरून, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे,पोलीस अंमलदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, विशाल पाटील, आनंद वाहूळ, रितेश देशमुख यांनी वसीम खान याला अटक केली. या आरोपीला सिडको पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.