मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 6 गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मावळ : हॅलो महाराष्ट्र – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात (accident) झाला आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर 6 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. या अपघातामुळे (accident) एक्स्प्रेसवर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती.

काय घडले नेमके?
हाती आलेल्या माहितीनुसार, खोपोलीजवळ बोरघाटात कंटेनरने एका खाजगी बसला मागून धडक दिली. हा अपघात (accident) इतका भीषण होता की, बसच्या मागील भागाचा पार चुराडा झाला आहे. तर कंटेनरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातग्रस्त बसमध्ये एकूण 35 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात (accident) बसच्या चालकाचा मृत्यू झाला तर 3 प्रवासी अत्यवस्थ तर एक गंभीर जखमी आहे. तसेच 10 ते 12 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्व जखमी व्यक्तींना पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही बस सिंधुदुर्गामध्ये लग्नाला गेली होती. कोल्हापूर मार्गे वाशिंदला परतताना बसला पाठीमागून कंटेनरने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.

या अपघातामुळे (accident) एक्स्प्रेसवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच तातडीने आयआरबी, देवदूत, महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेची यंत्रणा घटनास्थळी दाखल असून मदतकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट