हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bus Stand In Alandi । महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. लवकरच राज्यात एक नवीन बस स्थानक उभारण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र आळंदी येथे पीएमपीचे नवीन आगार उभारले जाणार आहे. आळंदीला येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते, या भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी आळंदी येथे राज्य परिवहन महामंडळाची चार एकर जागा पीएमपीला देण्यात आली आहे.
सध्या आळंदीत ‘पीएमपी’चे आगार नाही. आळंदीत दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी छोट्या जागेत बस थांबा बांधण्यात आला.खरं तर आळंदीत दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने भाविकांच्या सोयीसाठी ‘पीएमपी’ प्रशासन गेल्या काही दिवसांपासून आगार बांधण्यासाठी जागेच्या शोधात होती. ‘पीएमपी’चे अध्यक्ष पंकज देवरे यांनी काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे जागा मिळण्यासाठी प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे वर्ग झाल्यानंतर आयुक्तांच्या माध्यमातून हा प्रस्ताव एसटी महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आला आणि एसटी महामंडळाने या पीएमपीच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या बस स्थानक उभारणीचा मार्ग मोकळा झाला. Bus Stand In Alandi
तब्बल 80 बसेस थांबू शकतील- Bus Stand In Alandi
लवकरच एसटी महामंडळाची चार एकर जागा पीएमपी प्रशासनाच्या ताब्यात हस्तांतरित होणार आहे. याच जागेवर पीएमपी प्रशासनाकडून एक भव्य आगार बांधले जाणार आहे. या प्रस्तावित बस स्थानकात तब्बल 80 बसेस थांबू शकतील असं बोललं जात आहे. आळंदीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी हे बस स्थानक अतिशय महत्वाचं ठरेल.
दरम्यान, श्रीक्षेत्र आळंदी हे पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी असलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, हे तीर्थक्षेत्र संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी स्थळामुळे ओळखले जाते. हे ‘अलंकापुरी’ किंवा ‘अलंका नगरी’ म्हणूनही ओळखले जाते आणि वारकरी संप्रदायाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. येथे ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर असून, हे एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे




