हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Business Idea) राज्यभरात ठिकठिणी पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे एकदाचा मान्सून सुरु झाला, असं म्हणायला आता हरकत नाही. पावसाळा सुरु झाला की, उन्हामुळे त्रस्त झालेले जीव सुखावतात. असा हा पाऊस प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. या सीझनमध्ये काही व्यवसाय मोठी कमाई करून देऊ शकतात. ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
पावसाच्या दिवसात काही उत्पादनांना मोठी मागणी असते. जसे की छत्री, रेनकोट, वॅट्स, वॉटरप्रूफ बॅग्स, रबर शूज. त्यामुळे मान्सूनमध्ये असे हंगामी व्यवसाय करणे फायद्याचे ठरू शकते. (Business Idea) हे व्यवसाय पावसाच्या चार महिन्यात चांगली बंपर कमाई करून देऊ शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात करता येतील अशा व्यवसायाबद्दल अधिक माहिती देणार आहोत. यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल? ते व्यवसाय कसा चालवायचा? इथपर्यंत आपण सगळी माहिती घेणार आहोत.
फक्त ५ हजार रुपयांची गुंतवणूक (Business Idea)
खरंतर पावसाळ्याच्या दिवसात बरीच उत्पादने मोठ्या प्रमाणात विक्री होतात. पण आपल्याला नेमके कोणते उत्पादन विकायचे आहे आणि ग्राहकांना कसे टार्गेट करायचे आहे? यानुसार गुंतवणूक करायची आहे. सुरुवातीला तुम्ही फक्त ५ हजार रुपये गुंतवणूक असा व्यवसाय सुरु करू शकता. कारण, सुरुवातीला थेट मोठा घाट घालण्यापेक्षा लहान स्केलपासून सुरुवात करणे फायद्याचे ठरेल. तरीही तुम्हाला तुमचा व्यवसाय किती प्रमाणावर सुरू करायचा आहे, हा सर्वस्वी तुमचा निर्णय राहील.
ग्राहक पसंतीचा विचार
पावसाळ्यात रेनकोट, छत्री, मच्छरदाणी आणि रबर शूजची मागणी सगळ्यात जास्त असते. त्यामुळे अशी उत्पादने तुम्ही घाऊक बाजारातून खरेदी करा आणि स्थानिक बाजारपेठेत यांची विक्री करा. ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा कमावता येईल. तसेच अशा वस्तू तुम्ही थेट उत्पादकांकडून खरेदी करूनही विकू शकता. (Business Idea) अशा अनेक वेबसाईट आहेत ज्यावर तुम्हाला उत्पादकांची माहिती मिळेल.
उन्हाळ्यात सूर्यकिरणांपासून बचावासाठी तर मान्सूनमध्ये पावसाच्या सरींपासून आपले रक्षण करण्यासाठी छत्र्यांचा मोठा वापर केला जातो. त्यामुळे अशा दिवसांमध्ये छत्र्यांना मोठी मागणी असते. शिवाय बाजारात अनेक प्रकारच्या छत्र्या उपलब्ध आहेत. आकर्षिक आणि चांगल्या दर्जाच्या विविध किमती श्रेणींमध्ये यांची विक्री केली जाते. (Business Idea) तुम्हाला ग्राहक पसंतीचा विचार करून आणि काही प्रमाणात उत्पादनाच्या किंमतींची तुलना असे संशोधन करून चांगल्या उत्पादनांची खरेदी करणे गरजेचे आहे.
‘असा’ मिळेल मोठा नफा
पावसाळ्यात ज्या उत्पादनांची सर्वाधिक गरज असते त्यावर लक्ष केंद्रित करा. घाऊक बाजारातून कमीत कमी किंमतीमध्ये अशा वस्तू खरेदी करा आणि स्थानिक बाजारात चढ्या किंमतीने त्याची विक्री करा. तसेच रेनकोट, मच्छरदाणी यांसारखी उत्पादने तुम्ही घरी बनवू शकता. (Business Idea) जर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर घाऊक बाजारातून आवश्यक त्या वस्तू खरेदी करून ही उत्पादने घरच्या घरी बनवा. यानंतर स्थानिक बाजारात तुम्ही तयार केलेली उत्पादने २०% ते ३०% नफा मिळेल अशा किंमतीने विका. ज्यामुळे सुरुवातीला ५ हजार रुपयांची गुंतवणूक केली तरीही तुम्ही दरमहा १५ हजार ते ३५ हजार रुपये आरामात कमवाल.