Business Idea : केळीच्या सालीपासून कागद बनवा आणि लाखो रुपयांची कमाई करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Business Idea| आजकाल तंत्रज्ञानामुळे घर बसल्या अनेक उद्योग सुरु करता येतात आणि त्याच्या मदतीने लाखो रुपये कमवले जात आहेत. त्यातच कमी पैशात व्यवसाय सुरु करून बक्कळ नफा कमवावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्ही सुद्धा नवा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशी एक आयडिया सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. मित्रानो, केळी पासून अनेक पदार्थ केले जातात. तसेच केळीच्या सालीपासून तयार होणारे पदार्थही तुम्ही ऐकले असतील, परंतु तुम्ही कधी हे ऐकलय का की केळीच्या सालीपासून कागद बनवला जातो. तर हे शक्य आहे. या कागदापासून तुम्ही बिजनेस करू शकता. तो कसा ते जाणून घेऊयात.

केळीच्या सालीपासून बनवलेला कागद हा सामान्य कागदापेक्षा कमी घनतेचा असतो.  हा कागद केळीच्या सालीच्या तंतुपासून बनवला जातो. त्याचा वापर करून लाखो रुपये कमवू शकता. त्यासाठी भांडवल किती लागेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर केळीच्या सालीच्या कागदाचा बिजनेस करण्यासाठी तुम्हाला 16 लाख 47 हजार रुपयाचे भांडवल लागेल. असे खादी व ग्रामोदय आयोगाने मॅन्युफॅक्चर युनिटच्या एका रिपोर्ट नुसार सांगितले आहे.

केळीच्या धाग्याचा उपयोग नेमका काय?

केळीच्या सालीपासून धागा बनवून त्याचा व्यवसाय करणे इतपर्यंत गोष्ट तुम्हाला समजली असेल. मात्र तुम्हाला हा प्रश्न पडणं साहजिक आहे की या केळीच्या धाग्याचा नेमका उपयोग होतो तरी कशासाठी? केळीच्या धग्याच्या उपयोग हा हस्तकला वस्तू, पिशव्या, उच्च-गुणवत्तेचे कापड, दोरी, माशांचे जाळे, पडदे यासारख्या अनेक वस्तू तयार करण्यासाठी उपयोगी असतो. या वस्तू या धाग्यामुळे चांगल्या दर्जाच्या बनतात. त्यामुळे तुम्ही याचा व्यवसाय केला तर तुम्हाला यातून चांगला फायदा मिळू शकतो. आणि तुमचा व्यवसायात (Business Idea) वृद्धी होऊ शकते.

किती होईल फायदा? Business Idea

साधारणपणे व्यवसाय (Business Idea) टाकल्यानंतर त्याचा आपल्याला फायदा किती होईल हे समजणें गरजेचे असते. त्यामुळे यार व्यवसायातून तुम्हाला जवळपास वार्षिक 5 लाख रुपयांहून अधिक नफा होऊ शकतो. जर तुम्ही योग्य पद्धतीने व्यवसायाचे नियोजन केल्यास त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. आणि तुमचा व्यवसाय वृद्धीस लागून नफ्यामध्येही वाढ होऊ शकते. तसेच तुम्ही तुमचे प्रॉडक्ट बाजारात आणण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू शकता. त्यामुळे तुम्हाला घर बसल्या ऑर्डर मिळवता येतील.