हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Business Idea अनेक शेतकरी शेतीसोबत व्यवसाय देखील करत असतात. त्यातून त्यांना चांगला फायदा होतो. शेतकरी आजकाल पारंपारिक शेती मागे सोडून नवनवीन पद्धतीचा अवलंब करत आहे. यांत्रिकीकरणाचा प्रभावामुळे चांगल्या प्रकारे शेती करता येते. त्याचप्रमाणे वेगवेगळी पिके देखील घेत आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच नफा मिळत आहे. आज आपण या लेखांमध्ये अशा एका पिकाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याकडे तुम्ही व्यवसाय म्हणून देखील बघू शकता. त्यातून तुम्हाला खूप कमाई होईल. आज आपण कोरफडीच्या लागवडीबद्दल माहिती सांगणार आहोत.
कोरफड ही वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत फायदेशीर आहे. कोरफडीचे अनेक आपल्याला फायदे होतात. आपल्या आरोग्यासाठी कोरफड ही एक वरदान आहे. औषधे बनवण्यासाठी तसेच सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी त्याचप्रमाणे मोठमोठ्या कंपनीमध्ये देखील कोरफडीला खूप जास्त प्रमाणात मागणी असते. प्रत्येक सीजनला कोरफडीची मागणी कायमच असते
तुम्ही जर शेतामध्ये कोरफडीची लागवड केली, तर तुम्हाला त्यातून खूप चांगला नफा मिळेल. तुम्हाला बाहेर जाऊन ही कोरफड विकावी लागेल. त्यातून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. परंतु तुम्हाला तुमच्या कोरफड मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला उच्च दर्जाची कोरफड विकत घ्यावी लागेल. आणि त्यानंतर त्याची लागवड करावी लागेल. यातून तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. कारण आतापर्यंत अनेक लोकांनी या कोरफडीची लागवड करून चांगले पैसे कमावलेले आहेत.
कोरफड या पिकाची लागवड करण्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट प्रकारची जमीन निवडावी लागेल. जिथे पाण्याचा निचरा पूर्ण होईल अशा प्रकारची जमीन तुम्हाला निवडावी लागेल. त्यानंत आपल्या येथील हवामानानुसार कोणती कोरफडीची कोणती जात योग्य आहे? ते ठरवून नंतर लागवड करावी लागेल. कोरफड हे जास्त थंड हवामानात पिकवता येत नाही. ज्या ठिकाणी जास्त पाणी साचते. त्या ठिकाणी देखील या कोरफडीचा व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे तुम्ही कृषी तज्ञांचा सल्ला घेऊन देखील ही कोरफडीची शेती करू शकता. कोरफडीचा हा व्यवसाय 12 महिने चालू असतो. त्यामुळे तुम्हाला वर्षातील बाराही महिने नफा मिळणार आहे.